Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

भक्त परिवाराचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटलांना साकडे

- श्री क्षेत्र त्रिवेणीश्‍वर महादेव देवस्थानात बहुउद्देशीय हॉल उभारण्याची मागणी

नेवासाफाटा/प्रतिनिधीः नेवासा तालुक्यातील हंडीनिमगाव येथील श्री क्षेत्र त्रिवेणीश्‍वर  महादेव देवस्थान प्रांगणात बहुउद्देशीय हॉल उभारण्यात यावा. य

सुप्रिया सुळे यांच्या टीकेवर विखे पाटील यांचं उत्तर
बदलीच्या ठिकाणी हजर न होणार्‍या अधिकार्‍यांची सेवा खंडित करणार
अजित पवारांनी नगरला येऊन काय केले ? गडकरींनाच फोन केला ना ?

नेवासाफाटा/प्रतिनिधीः नेवासा तालुक्यातील हंडीनिमगाव येथील श्री क्षेत्र त्रिवेणीश्‍वर  महादेव देवस्थान प्रांगणात बहुउद्देशीय हॉल उभारण्यात यावा. यासाठी भक्त परिवाराने जिल्हयाचे पालकमंत्री  राधाकृष्ण विखे पाटलांना साकडे घातले. त्याबाबतचे निवेदन श्रीराम कथा सोहळयात देवस्थानचे प्रमुख महंत श्री रमेशानंदगिरीजी महाराज यांच्या हस्ते जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनी विखे पाटील यांना भेट देण्यात आले.
   सदर निवेदनात म्हटले आहे की,  प्रभू रामचंद्राच्या पदस्पर्शाने पुनित झालेल्या श्री स्वयंभू त्रिवेणीश्‍वराच्या पावनभुमीत महाशिवरात्रीच्या कालवधीमध्ये भव्य दिव्य असा महाशिवरात्रोत्सव तसेच प्रत्येक महिन्याच्या पोर्णिमेला भजन किर्तन व रक्तदान शिवीर, सामाजिक उपक्रम साजरे केले जातात. तसेच श्रावण महिन्यामध्ये प्रत्येक सोमवारी व रक्षाबंधन पोर्णिमेच्या दिवशी योगीराज अजानबाहु प्रल्हादगिरीजी महाराज यांची पुण्यतिथी सोहळ्याचे आयोजन करण्यात येत असते. या सोहळ्यामध्ये पंचकोशीतील भाविकांच्या सहकार्याने लाखो भाविकांना अन्नदान करण्यात येते. महाशिवरात्रीच्या दिवशी स्वयंभू त्रिवेणीश्‍वर देवस्थान येथे लाखो भाविक तसेच पुण्यतिथी सोहळ्यासाठी हजारो भाविक दर्शनासाठी येत असतात. वर्षभर होणार्‍या कार्यक्रमासाठी भाविकांना बसण्यासाठी सेवा सुविधा अपूरी पडत आहे. दिवसेंदिवस भाविकांची वाढती संख्या लक्षात घेता किर्तन व कार्यक्रमासाठी बसण्यासाठी सध्या असलेले शेड कमी पडत आहे. त्यासाठी तिर्थक्षेत्र विकासमधून 125 बाय 250 चा बहुउददेशिय हॉल मंजूर करून मिळावा. या कार्यामध्ये सहभाग घेवून आम्हाला उपकृत करावे. असे साकडे निवेदनात घालण्यात आले आहे.
सदरचे निवेदन जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालीनी विखे पाटील यांना महंत रमेशानंदगिरीजी महाराज यांच्या हस्ते व जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व भाजपचे जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव लंघे पाटील,भाजपचे राज्य प्रवक्ते नितीन दिनकर यांच्या उपस्थितीत देण्यात आले.

COMMENTS