Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

लग्नास नकार दिल्याने प्रियकर व प्रियासी ने उचलले टोकाचे पाऊल

विषारी औषध प्राशन करून जीवन संपविण्याचा केला प्रयत्न..

लोहा प्रतिनिधी - लोहा तालुक्यातील मात्र उस्माननगर पोलिस ठाणे हद्दी अंतर्गत असलेल्या भोपाळवाडी येथे तरुणीच्या राहत्या घरी तरुणाने विषारी औषध घेवू

चोपडा तालुक्यातील पाच ग्रामपंचायतींसाठी 73 टक्के मतदान
मनपा शाळेतील विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षण देणार – महापौर रोहिणी शेंडगे
चंद्रपूरमध्ये मजुरांच्या बसचा भीषण अपघात

लोहा प्रतिनिधी – लोहा तालुक्यातील मात्र उस्माननगर पोलिस ठाणे हद्दी अंतर्गत असलेल्या भोपाळवाडी येथे तरुणीच्या राहत्या घरी तरुणाने विषारी औषध घेवून जात बाथरूम मध्ये तरुण आणि तरुणीने अर्थात प्रियकर आणि प्रियासिने विषारी औषध प्राशन केले. त्यात तेवीस वर्षीय तरुणीचा उपचारादरम्यान नांदेड येथील शासकीय रुग्णालयात मृत्यू झाला तर तरुणाची प्रकृती अत्यवस्थ असल्याचे सांगण्यात आले. तरुण आणि तरुणी हे अत्या मामाचे असल्याचे समजते. याप्रकरणी मयत तरुणीच्या आईने उस्माननगर पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून आरोपी तरुण विरुद्ध खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
लोहा तालुक्यातील कलांबर नजिक भोपाळ वाडी येथील पंचवीस वर्षीय तरुण रोहिदास पद्माकर जाधव याचे गावातच राहणार्‍या अत्याची मुलगी सुप्रिया मारोती जाधव (वय 23) हिच्याशी मागील कांहीं कालावधी पासून प्रेमसंबंध होते. तरुणाच्या वडिलांनी नात्याने चुलत बहीण असलेल्या लक्ष्मीबाई जाधव यांच्याकडे मुलगा रोहिदास व सुप्रियाचा विवाह करण्याची मागणी केली असता लक्ष्मीबाई यांनी विरोध दर्शविला. चिडलेल्या तरुण रोहिदास याच्या मनात विवाह होत नसल्याची सल झाल्याने त्याने दि. 3 जुलै रोजी मध्यरात्री साडे तीन वाजता घरात प्रवेश करून सुप्रिया हिस त्यांच्याच बाथरूम मध्ये घेवून जात शितपेयात घेवून गेलेले विषारी औषध सुप्रिया हिस पाजवून आपण स्वतः देखील प्रश्न केले. कांहीं वेळानंतर सुप्रिया बाथरूम मधून बाहेर आली त्यापाठोपाठ रोहिदास देखील बाथरूम मधून बाहेर आला. कांहीं वेळानंतर मुलीस उलट्या होत असल्याने तिची चौकशी केली असता. रोहिदास याने विषारी औषध पाजल्याचे तिने आईला सांगितले. मग तत्काळ मुलीच्या कुटुंबीयांनी तरूनिस  नांदेड विष्णुपुरी येथील शासकीय रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. मात्र दि. 4 जुलै रोजी सकाळी साडेसात वाजता सुप्रिया मृत पावली. तर रोहिदास याच्यावर देखील उपचार सुरू आहेत. सदरील घटनेप्रकरणी मयत तरुणीच्या आईने उस्मान नगर पोलिसात दिलेल्या तक्रारीवरून आरोपी तरूना विरुद्ध खुनाचा गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास सपोनी भरती यांच्या मार्गदर्शनाखाली पो उप. नि. गाडेकर करीत आहेत.

COMMENTS