Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

ग्रंथ व वृक्ष दिंडी आयोजन करून 130 वृक्ष विद्यार्थ्यांना वाटप…

जि.प.प्रा.केंद्र शाळा पोटादा येथील शाळेचा आनोखा उपक्रम...!

आष्टी - जि.प.प्रा.केंद्र शाळा पाटोदा येथे गटविकास अधिकारी श्री.प्रकाश पोळ साहेब,गटाशिक्षणाधिकारी श्री.बाळासाहेब धनवे साहेब,श्री.प्रमोद (दादा) म

जलमापक बसविण्यास विरोध करणे पडणार महागात
अबू आझमी ‘प्राप्तिकर’च्या रडारवर
भारतीय संघासाठी खूशखबर; टी २० वर्ल्डकपमध्ये थेट ‘एन्ट्री’

आष्टी – जि.प.प्रा.केंद्र शाळा पाटोदा येथे गटविकास अधिकारी श्री.प्रकाश पोळ साहेब,गटाशिक्षणाधिकारी श्री.बाळासाहेब धनवे साहेब,श्री.प्रमोद (दादा) मोरे (निसर्ग व सामाजिक प्रदूषण निवारण मंडळ राज्य अध्यक्ष)यांच्या प्रेरणेने व मार्गदर्शनाखाली वृक्षदिंडी व ग्रंथदिंडी चे आयोजन करुन समाज जागृती करण्याचा प्रयत्न केला.पर्यावरणाचा संदेश गावपातळीवर पोहचण्यासाठी छोटासा प्रयत्न केला.सर्वप्रथम वृक्षदिंडी व ग्रंथदिंडी गावातून काढली.पालखी मध्ये संविधान, भगवतगीता व हातामध्ये कुराण या ग्रंथाचां समावेश होता. मुलांच्यां हातात घोषवाक्याचे फलक,मुलींच्यां डोक्यावर वेगवेगळी रोपे होती.शाळेत दिंडी पोहचल्यानंतर प्रथम सावित्रीबाईंच्यां प्रतिमेचे पूजन करण्यात आले.यावेळी मुलांना वृक्षाचे व वाचन अभ्यासाचे महत्व मुख्याध्यापक श्री.उत्तम पवार सरांनी पटवून दिले.तसेच विद्यार्थ्यांनी लावल्या वृक्ष रोपांचें संवर्धन करण्याचा  व वाचन करण्याचा निर्धार केला..श्रीम.अनिता जोगदंड मॅडम,श्रीम.सुलभा हजारे मॅडम यांनी मनोगत व्यक्त केले. श्रीम.संगिता राठोड मॅडम यांनी  सुत्रसंचलन केले श्रीम.आश्विनी कुमठेकर मॅडम यांनी आभार मानले..शा.व्य.समितीीचे अध्यक्ष व उपाध्यक्ष,सरपंच,उपसरपंच सर्व सदस्य तसेच गावातील पालक,ग्रामस्थाचें सहकार्य लाभले.विस्तार अधिकारी श्री . सुनिल जाधव साहेब,केंद्र प्रमूख श्री संतोषकुमार राऊत साहेब, निसर्ग व सामाजिक प्रदूषण निवारण मडंळ राज्य प्रसिद्धी प्रमूख़ श्री.आण्णासाहेब साबळे व जामखेड व आष्टी तालूक्यातील सर्व शिक्षकांनी अभिनंदन केले.

COMMENTS