Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

तब्बल नऊ वर्षांनंतरही संयुक्त पाणी पुरवठा योजनेचा बट्याबोळ

चौकशी समितीने इकडे ही लक्ष द्यावे; शिराढोण व उस्मान नगर परिसरातील नागरिकांची मागणी

उस्माननगर प्रतिनिधी - ग्रामीण भागातील नागरिकांना स्वच्छ आणि शुद्ध पाणी मिळावे या उद्देशाने शासनाकडून गाव, वाडी, वस्त्यांसाठी राष्ट्रीय ग्रामीण पे

पावसाळ्यापूर्वी सोलापूरकरांच्या हक्काच्या पाण्याचा प्रश्न सोडवा अन्यथा जनआंदोलन करू- शिवसेना  जिल्हा संपर्कप्रमुख  शिवाजी सावंत 
बारावीची 4 तर दहावीची 15 मार्चपासून परीक्षा
नव्या शैक्षणिक धोरणामुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास

उस्माननगर प्रतिनिधी – ग्रामीण भागातील नागरिकांना स्वच्छ आणि शुद्ध पाणी मिळावे या उद्देशाने शासनाकडून गाव, वाडी, वस्त्यांसाठी राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमाअंतर्गत संयुक्त पाणी पुरवठा योजना, जलजीवन मिशन आशा विविध योजना राबवित आहे़  सदर योजनांच्या प्रस्तावास शासनस्तरावरून चांगला प्रतिसाद मिळत आहे, परंतु अशुद्ध अन् फ्लोराईडमिश्रिम पाणी, पाण्याचे स्त्रोत नसणे, ग्रामपंचायतीचा वाद, कंत्राटदरांचा कामचुकारपणा, जागेचा वाद यासह काही अधिकार्यांच्या उदासीनतेमुळे अनेक योजनांची कामे रखडली आहेत़ तर काही योजना पूर्ण होवूनदेखील प्रत्यक्षात पाणीपुरवठा झालेला नाही़ त्यामुळे सदर योजना ’असून अडचण नसून खोळंबा’अशी स्थिती झाली आहे़ पाणी हा मानवाचा मुलभूत हक्क असल्याचे. पण लोकांच्या हक्काच्या पाण्यावर काही चोरांनी डल्ला मारलाय. त्यामुळे कंधार तालुक्यातील शिराढोण -भूत्यांचीवाडी -शिराढोण तांडा येथील जनतेला पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. सरकारने ग्रामीण भागातील जनतेला शुद्ध आणि घरपोच पाणी मिळेल म्हणून हजारो कोटी खर्च केले परंतु पाण्याची पाण्याची समस्या कायम आहे.
कंधार तालुक्यातील शिराढोण-उस्माननगर -भूत्यांचीवाडी आणि शिराढोण तांडा अशी संयुक्त पाणी पुरवठा योजना सन जानेवरी 2014साली मंजूर केली परंतु या योजनेचे पाणी काही शिराढोण वासियांच्या भांड्यात आद्याप  पडले नसल्याची शोकांतिका असल्याचे बोलल्या जात आहे. शिराढोण -उस्माननगर परिसर डोळ्यासमोर आलं म्हणलं कि पहिले दुष्काळ भाग म्हणून ओळखल्या जात होता परंतु दुष्काळ भाग जलमय करून सुजलाम सुफलाम व्हावा यासाठी लोकनेते कै. माधवराव पांडागळे यांनी तत्कालीन मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण आणि तत्कालीन आमदार शंकर आण्णा धोंडगे यांच्या माध्यमातून योजना मंजूर करून घेतली परंतु भ्रष्ट अधिकारी आणि गुत्तेदार यांनी मात्र योजनेचा बट्याबोळ केल्या असल्याचे चित्र सद्या परिस्थितीत पाहवयास मिळत आहे. शिराढोण व परिसरातील जनतेसाठी सुधारित पाणीपुरवठा योजना जवळपास 9वर्षांनंतरही मृगजळच ठरली आहे. आतापर्यंत या योजनेचे केवळ 60 ते 70 टक्के काम पूर्ण झाले आहे. ही योजना तीन वर्षांत कार्यान्वित होणे आवश्यक होते. परंतु प्रशासन सत्ताधार्‍यांना त्यात अपयश आले. विशेष म्हणजे आणखी काही वर्षांनी योजना कार्यान्वित झाली, तरी शिराढोण वासियांना योजनेचे पाणी मिळेलच, याची शाश्वती नाही. राज्य शासनाच्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागामार्फत हाती घेतलेल्या संयुक्त पाणी पुरवठा योजनेचे काम संबंधित विभागाच्या ढिसाळ कारभारामुळे तब्बल 9वर्षांपासून रखडले आहे. परिसरासाठी महत्त्वपूर्ण असलेली ही अंदाजे 10कोटी 45लक्ष 16हजार रुपयांची योजना कार्यान्वित होण्याची आशा आता धूसर झाली आहे. 2014मध्ये कार्यांरभ आदेश देण्यात आला. कामाची मुदत संपल्यानंतर वारंवार मुदतवाढही देण्यात आली. या कालावधीत  सत्तांतर झाले परंतु योजनेचे काम पुढे सरकलेच नाही.ठेकेदार संस्थेवर प्रशासनाचा कोणताही वचक राहिलेला नाही. सत्तांतर होऊन निवडून आलेल्या प्रत्येक पदाधिकार्‍यांनी योजनेच्या कामासाठी वारंवार आढावा बैठका घेतल्या. योजना पूर्ण करण्याच्या आणाभाका घेतल्या, परंतु त्यातून काहीच निष्पन्न झाले नाही. त्यामुळे तब्बल नऊ वर्षांनंतरही शिराढोण वासियांसाठी संयुक्त पाणी पुरवठा योजना मृगजळच ठरली आहे. सध्या नांदेड जिल्ह्यात जलजीवन मिशन पाणी पुरवठा योजनेच्या कामांची चौकशी करण्यासाठी पथके दाखल झाले आहे त्यामुळे या चौकशी सोबत शिराढोण येथील राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमाअंतर्गत झालेल्या संयुक्त पाणी पुरवठा योजनेच्या अपुर्‍या कामाचा उलघडा आणि चौकशी होईल का?असा सवाल पाण्यासाठी तहानलेल्या जनतेतून होत आहे.

COMMENTS