Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

प्रा. डॉ. विजय देशमुख यांना सुवर्णपदक

नॅशनल मास्टर्स गेम्समध्ये पटकावले पदक थायलंड येथे होणार्‍या ’वर्ल्ड मास्टर्स गेम्ससाठी निवड पाथर्डी ः येथील बाबुजी आव्हाड महाविद्यालयाचे शारीरिक शिक्ष

शिराळा तालुक्यातील चांदोली धरण शनिवारपासून पर्यटकांसाठी खुले
पंचांनीच हरवायचे ठरवले तर जिंकणार कसे ?
लिबर्टी मंडळाचा दैदिप्यमान गौरवशाली इतिहास : गिरीष इरनाक याचे गौरवोद्गार

नॅशनल मास्टर्स गेम्समध्ये पटकावले पदक
थायलंड येथे होणार्‍या ’वर्ल्ड मास्टर्स गेम्ससाठी निवड
पाथर्डी ः येथील बाबुजी आव्हाड महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण संचालक प्रा. डॉ. विजय देशमुख यांनी महाराष्ट्र राज्य मास्टर्स गेम्स असोसिएशनच्या वतीने नाशिक येथे आयोजित करण्यात आलेल्या पहिल्या ’युनायटेड नॅशनल मास्टर्स गेम्स’ मध्ये वेटलिफ्टिंग आणि पॉवरलिफ्टिंग अशा दोन्ही क्रीडा प्रकारांत दोन सुवर्णपदके पटकावली आहे.
प्रा. डॉ. देशमुख यांनी 50 वर्षांवरील वयोगटात महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधित्व केले.त्यांनी आपल्या कौशल्याच्या जोरावर वेटलिफ्टिंग स्पर्धेत एकूण 155 किलो वजन उचलले तर पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत एकूण 360 किलो वजन उचलून सुवर्णपदकावर नाव कोरले. याआधी त्रिवेंद्रम येथील ’नॅशनल मास्टर्स गेम्स’ आणि पिंपरी-चिंचवड येथील राज्यस्तरीय स्पर्धेतही त्यांनी सुवर्ण यश संपादन केले होते. नाशिकमधील या विजयामुळे त्यांच्या सुवर्णपदकांची दिमाखदार ’हॅट्ट्रिक’ पूर्ण झाली आहे. या दैदीप्यमान यशामुळे त्यांची आगामी वर्ल्ड मास्टर्स गेम्ससाठी भारतीय संघात निवड झाली आहे. ही स्पर्धा 17 ते 20 एप्रिल 2026 या कालावधीत श्रीराचा, थायलंड येथे संपन्न होणार आहे. या यशाबद्दल पार्थ विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अभय आव्हाड, उपाध्यक्ष ड. सुरेशराव आव्हाड, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बबन चौरे, तसेच अहिल्यानगर जिल्हा वेटलिफ्टिंग संघटनेचे अध्यक्ष प्रा.सुभाष देशमुख, उपाध्यक्ष राजेंद्र सोनवणे, प्रा. संजय धोपावकर तसेच सर्व पदाधिकारी, खेळाडू आणि क्रीडा क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे विशेष अभिनंदन केले.

COMMENTS