Homeताज्या बातम्यादेश

हिमाचल प्रदेशात भाजपला बंडखोरीचे ग्रहण

पाच बंडखोर नेत्यांना पक्षातून केले निलंंबित

शिमला प्रतिनिधी : हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर भाजपने 5 बंडखोर नेत्यांना पक्षातून निलंबित केलेय. यामध्ये पक्षाच्या प्रदेश उ

सत्ता नसतानाही शिवसेना-भाजपाने २०-२५ वर्षे एकत्र राहून काम केले…
इस्लामपूर भाजपा कार्यालयावर उच्च न्यायालयाचा हातोडा
कोण होणार गुजरातचे नवे मुख्यमंत्री …

शिमला प्रतिनिधी : हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर भाजपने 5 बंडखोर नेत्यांना पक्षातून निलंबित केलेय. यामध्ये पक्षाच्या प्रदेश उपाध्यक्षाचाही समावेश आहे. पक्षाने सोमवारी ही कारवाई केली. निलंबित भाजप नेत्यांमध्ये माजी आमदार तेजवंत सिंह नेगी ’किन्नौर’, किशोरी लाल ’अन्नी’, मनोहर धीमन ’इंदोरा’, के एल ठाकूर ’नालागढ’ आणि पक्षाच्या हिमाचल प्रदेश युनिटचे उपाध्यक्ष कृपाल परमार यांचा समावेश आहे.
या नेत्यांना भाजपनी तिकीट नाकारली आहे. यानंतर हे सर्वजण आपापल्या जागेवरून अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहेत. माजी राज्यसभा सदस्य परमार हे फतेहपूर मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवत आहेत. पक्षाच्या अधिकृत उमेदवाराविरुद्ध अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवल्याबद्दल भाजपचे प्रदेशाध्यक्ष सुरेश कश्यप यांनी या नेत्यांना पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वातून सहा वर्षांसाठी निलंबित केलंय. यापूर्वी 12 हून अधिक भाजप नेत्यांनी 12 नोव्हेंबर रोजी होणार्‍या विधानसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केले होते. परंतु, पक्ष नेतृत्वाच्या मध्यस्थीनंतर माजी खासदार महेश्‍वर सिंह, युवराज कपूर आणि धर्मशाला ब्लॉक अध्यक्ष अनिल चौधरी यांनी अपक्ष म्हणून आपली नावे मागे घेतली आहेत.

COMMENTS