Homeताज्या बातम्यामनोरंजन

विराट -अनुष्काचे देव दर्शन

काही दिवसांपूर्वीच रॉयल चॅलेंजर्स बँगलोर विरुद्ध लखनऊ सुपर जाएंट्स यांच्यात झालेल्या सामन्यानंतर विराट कोहली आणि लखनऊ टीमचा मेंटॉर गौतम गंभीर यां

आरआयटीच्या ऋतुराज पाटीलची शिवाजी विद्यापीठ संघामध्ये निवड
नगरच्या धावपटूंनी गाजवली कोल्हापूरची मॅरेथॉन
टीम इंडियाच्या ड्रेसिंग रुममध्ये PM मोदी

काही दिवसांपूर्वीच रॉयल चॅलेंजर्स बँगलोर विरुद्ध लखनऊ सुपर जाएंट्स यांच्यात झालेल्या सामन्यानंतर विराट कोहली आणि लखनऊ टीमचा मेंटॉर गौतम गंभीर यांच्यात वादाची ठिणगी पडली. विराट आणि लखनऊचा गोलंदाज नवीन यांच्यात मैदानावर झालेल्या वादात गौतम गंभीरने उडी घेतली होती. सध्या सर्वत्र या राड्याची चर्चा सुरु असताना विराट पत्नी अनुष्का शर्मा सोबत देव दर्शनाला गेल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. उत्तरप्रदेश येथील एकना स्टेडियमवर आयपीएल 2023 मधील 43 व्या सामन्यात आरसीबीने लखनऊवर 18 धावांनी विजय मिळवला. लखनऊच्या होम ग्राउंडवर पारपडलेल्या सामन्यानंतर आरसीबीच्या विराट कोहली लखनऊच्या नवीन उल हक आणि गौतम गंभीर यांच्यात कडाक्याच भांडण झालं. विराट आणि  नवीन यांच्यात झालेल्या वादात गौतम गंभीरने देखील उडी घेतल्याने याला अजून वेगळा रंग चढला होता. इतर खेळाडूंनी केलेल्या मद्यस्थीनंतर हा वाद मिटला परंतु सोशल मीडियावर भांडणात सहभागी झालेल्या खेळाडूंना मोठ्या ट्रोलिंगला सामोरे जावे लागत आहे. दरम्यान गौतम गंभीर आणि नवीन उल हक यांच्यातील सामन्यांनंतर विराट कोहली पत्नी अनुष्का शर्मा सह एका मंदिरात दर्शनासाठी पोहोचला. विराट अनुष्काच्या या देव दर्शनाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात विराट कोहली धोतर आणि सोवळ्यात कपाळावर भस्म लावलेला पाहायला मिळत असून अनुष्का शर्मा ही साडीत दिसत आहे.

COMMENTS