Homeताज्या बातम्या

डॉ. व्ही. व्ही. पोपेरे यांना ‘राष्ट्रीय कर्तव्य सन्मान’ पुरस्कार; अभिनेत्री अमिषा पटेल यांच्या हस्ते गौरव

अकोले : आदिवासी भागातील उल्लेखनीय सामाजिक कार्याची दखल घेत डॉ. व्ही. व्ही. पोपेरे यांना ‘राष्ट्रीय कर्तव्य सन्मान २०२६’ पुरस्काराने गौरविण्यात आल

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील १२ वर्षपूर्तीनिमित्त अकोलेत विविध उपक्रम; दर्ग्यात चादर अर्पण करून विशेष प्रार्थना
अकोले तालुक्यातील कोतुळ ग्रामीण रुग्णालयाचे ‘भौतिक आरोग्य’ धोक्यात; मूलभूत सुविधांच्या अभावामुळे रुग्ण आणि कर्मचारी त्रस्त
सह्याद्री उजळला काजव्यांच्या मायावी प्रकाशाने! अकोलेतील ‘काजवा महोत्सवा’ला पर्यटकांची झुंबड; निसर्गाचा अद्भुत सोहळा

अकोले : आदिवासी भागातील उल्लेखनीय सामाजिक कार्याची दखल घेत डॉ. व्ही. व्ही. पोपेरे यांना ‘राष्ट्रीय कर्तव्य सन्मान २०२६’ पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. ठाणे येथे ‘शिवओम फाउंडेशन’च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या एका भव्य पुरस्कार वितरण सोहळ्यात हा सन्मान प्रदान करण्यात आला.

या सोहळ्याला हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री अमिषा पटेल, युवा उद्योजक तथा ‘जेनरिक आधार’चे संस्थापक अर्जुन देशपांडे यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. कला, क्रीडा, समाजसेवा आणि प्रशासकीय सेवा या क्षेत्रांत अद्वितीय कार्य करणाऱ्या देशभरातील निवडक व्यक्तींचा यावेळी गौरव करण्यात आला.

आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी आणि विविध सामाजिक उपक्रमांमध्ये सातत्याने दिलेल्या अमूल्य योगदानाबद्दल डॉ. पोपेरे यांची या मानाच्या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. पुरस्कार स्वीकारल्यानंतर भावना व्यक्त करताना डॉ. पोपेरे म्हणाले की, “हा सन्मान माझ्या सामाजिक सेवा कार्याला अधिक ऊर्जा आणि बळ देणारा ठरेल.” या यशामुळे अकोले तालुक्यासह संपूर्ण परिसरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

COMMENTS