Homeताज्या बातम्यासंपादकीय

हवामान बदलाचे संकट

महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून थंडीचा कडाका चांगलाच वाढतांना दिसून येत आहे. राज्यातील काही जिल्ह्यात केवळ 5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण

…तरीही, सरकार कायदेशीर
आश्‍वासनांची खैरात आणि अर्थव्यवस्थेचे दिवाळे
प्रदूषणाचे दिवाळे

महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून थंडीचा कडाका चांगलाच वाढतांना दिसून येत आहे. राज्यातील काही जिल्ह्यात केवळ 5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे. जी नोंद अर्धशतकातील सर्वात कमी तापमानाची नोंद आहे. तर दुसरीकडे उत्तर भारतात थंडीच्या लाटेमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. तर अनेक ठिकाणी धबधबे, समुद्र, तलाव, बर्फाने गोठल्याचे चित्र आहे. वाढत्या थंडीचा कृषी क्षेत्रावर मोठा परिणाम होतांना दिसून येत आहे. त्यामुळे अनेक पिके धोक्यात येतांना दिसून येत आहे. विशेष म्हणजे गेल्या वर्षी मार्च 2022 मध्ये शतकातील सर्वात तप्त उन्हाळा बघायला मिळाला. त्यामुळे हवामान बदलाचे संकट गडद होतांना दिसून येत असतांना, त्यादृष्टीने उपाययोजना होतांना दिसून येत नाही. नुकतीच इजिप्तमध्ये झालेल्या हवामान परिषदेमुळे वाढते प्रदूषण रोखण्यासाठी उपाययोजना करण्यासाठी सर्वच देशांनी पुढाकार घेतला असला तरी, देखील त्या दिशेने तितके गांभीर्याने प्रयत्न होतांना दिसून येत नाही.

हवामान बदल हा आता एका राज्याचा किंवा देशाचा प्रश्‍न नसून हा प्रश्‍न जागतिक विषय चर्चेचा ठरतांना दिसून येत आहे. उष्ण तापमान, कडाक्याची थंडी यामुळे पिकांवर मोठा परिणाम होतांना दिसून येत आहे. अचानक कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यास अवकाळी पाऊस, गारपीट, कडाक्याची थंडी, उष्णतेची लाट, ओला दुष्काळ, कोरडा दुष्काळ या सर्वांचा परिणाम पिकांच्या उत्पादनावर होतांना दिसून येत आहे. तापमानात जर अचानक बदल होऊन जर कडाक्याची थंडी किंवा लाट आली तर, केळी, द्राक्षे, फळबागा, भाजीपाला या पिकांवर परिणाम दिसून येतो. ढगाळ हवामानामुळे उभ्या पिकांवर वेगवेगळ्या किडी व रोगांचा हमखास प्रादुर्भाव होता. किडी-रोगांचे नियंत्रण करण्यासाठी खर्च तर वाढतोच शिवाय उत्पादनात घट होते. ढगाळ हवामानामुळे पिकांना पुरेसा सूर्यप्रकाश मिळत नाही. त्यामुळे पिकाची क्रिया ठप्प होते व उत्पादनात घट होते. आणि राज्यात सध्या कडाक्याच्या थंडीमुळे पिकांवर परिणाम होतांना दिसून येत आहे.

वाढते प्रदूषण आणि कृत्रिम साधनांचा वाढत्या वापरामुळे मानवी जीवनांवर गंभीर परिणाम होतांना दिसून येत आहे. वाढते प्रदूषण तसेच अन्य कारणांनी हवामान बदलाचे मोठे संकट उभे राहिले आहे. या बदलाचे अनेक क्षेत्रांवर होत असलेले दुष्परिणाम समोर येत आहेत. त्यातील कृषीक्षेत्रावरील दुष्परिणाम हा गांभीर्याने विचार करण्याजोगा मुद्दा आहे. त्यामुळे या संकटाचा सामना करण्यासाठी आतापासूनच उपाय योजायला हवेत. त्यादृष्टीने बदलत्या हवामानात तग धरणार्‍या आणि अधिक उत्पादन देणार्‍या वाणांच्या निर्मितीवर भर द्यायला हवा. वाढत्या प्रदूषणाचे पर्यावरणावर प्रतिकूल परिणाम दिसू लागले आहेत. त्यातून हवामानातही कमालीचे बदल घडत आहेत आणि ही परिस्थिती शेती, कृषी उद्योग आणि इतर उद्योगधंदे यांच्यासाठी अतिशय बाधक ठरणारी आहे. तसेच ही परिस्थिती कीड-रोग यांच्या उत्पत्तीला अनुकूलसुद्धा आहे. सृष्टीच्या हवामानात वेगवेगळे घटक असतात, त्यातील कमी-जास्तपणा म्हणजेच हवामान बदल होय. परंतु अशा बदलांमागील कारणे, त्याचे दुष्परिणाम आणि त्यावरील उपाय यावर संशोधन करणे आणि त्यानुसार पावले उचलणे ही सध्याच्या काळाची प्रमुख गरज बनली आहे. खरे तर हवामानबदल ही ताबडतोब घडणारी किंवा परिणाम दाखवणारी बाब नाही. ती सातत्याने बदलणारी गोष्ट आहे. मानवाने स्वत:च्या विकासासाठी नैसर्गिक बाबींवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न सुरू केला. थोडक्यात निसर्गचक्रात ढवळाढवळ निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू केला तेव्हापासूनच हवामान बदलाच्या संकटाचे बिगुल वाजले, असे म्हणावयास हरकत नाही. त्याचे परिणाम आता कुठे दिसू लागले आहेत. त्यामुळे आता तरी हवामान बदल कशामुळे होतो, त्यावर नियंत्रण कसे मिळवता येईल आणि झालेल्या दुष्परिणामांचा सामना कसा करायचा, यावर गंभीरपणे विचार करावा लागत आहे.

COMMENTS