अकोले : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या पंतप्रधानपदाची धुरा सांभाळत यशस्वी १२ वर्षे पूर्ण केल्याबद्दल, भारतीय जनता पक्ष अल्पसंख्यांक मोर्चा
अकोले : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या पंतप्रधानपदाची धुरा सांभाळत यशस्वी १२ वर्षे पूर्ण केल्याबद्दल, भारतीय जनता पक्ष अल्पसंख्यांक मोर्चाच्या अकोले तालुका शाखेतर्फे अकोले येथील पक्ष कार्यालयात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम अत्यंत उत्साहात पार पडला.
भारतीय जनता पक्ष अल्पसंख्यांक मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष इद्रिस मुलतानी यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच माजी आमदार वैभव पिचड यांच्या नेतृत्वाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हा संयोजक सलीम बागवान यांनी कार्यक्रमाचे नेटके नियोजन केले. याप्रसंगी अकोले येथील हजरत गौसपाक दर्ग्यात विशेष प्रार्थना करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दीर्घायुष्य लाभावे, उत्तम आरोग्य प्राप्त व्हावे आणि त्यांच्या हस्ते देशसेवेचे कार्य अखंड सुरू राहावे, यासाठी दर्ग्यावर पवित्र चादर अर्पण करून देशाच्या प्रगतीसाठी दुआ मागण्यात आली.
या सोहळ्यादरम्यान पक्ष कार्यालयाच्या परिसरात वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेशही देण्यात आला. या कार्यक्रमाला अल्पसंख्यांक मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष फत्तू सय्यद, जिल्हाध्यक्ष रऊफ शेख, जिल्हा कार्याध्यक्ष नाजीम शेख, ज्येष्ठ नेते गिरजा जाधव, तालुकाध्यक्ष राहुल देशमुख, अब्दुल इनामदार, डॉ. सलीम शेख, मोसीन शेख, माजिद अत्तार यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. अकोलेप्रमाणेच संगमनेर, कोल्हार, बेलापूर आणि श्रीरामपूर येथेही अल्पसंख्यांक मोर्चातर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती फत्तू सय्यद यांनी दिली.

COMMENTS