Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नाशिक मध्ये पुन्हा हृदय पिळवटून टाकणारी घटना

तीन ते चार महिन्याच्या बाळाचा गळा चिरून हत्या

नाशिक: शहरात एक मन सुन्न करणारी धक्कादायक घटना घडली आहे. एका तीन महिन्याच्या निष्पाप चिमुकलीची गळा चिरून हत्या करण्यात आली आहे. नाशिक शहरातील गंग

राज्यसभेचा राजकीय खेळ !
संजीवनीच्या विद्यार्थ्यांची लायन्स मूकबधिर विद्यालयास भेट
शुभमंगल ऑनलाईन’ मालिकेमध्ये लगीनघाई सुरू l पहा LokNew

नाशिक: शहरात एक मन सुन्न करणारी धक्कादायक घटना घडली आहे. एका तीन महिन्याच्या निष्पाप चिमुकलीची गळा चिरून हत्या करण्यात आली आहे. नाशिक शहरातील गंगापूर रोडवर असलेल्या ध्रुव नगर परिसरात ही हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून अज्ञात महिलेविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. धृवांशी भूषण रोकडे वय ३ महिने, असं हत्या झालेल्या चिमुकलीचं नाव आहे.

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, शहरातील गंगापूर सातपूर लिंक रोड वर असलेल्या धृव नगर परिसरात भूषण रोकडे हे आपली पत्नी, आई आणि ३ महिन्याची चिमुकली यांच्यासमवेत राहतात. भूषण हे सातपूर येथील एका कंपनीत सुपरवायझर आहेत. सोमवारी ते नेहमीप्रमाणे कामाला गेले. तेव्हा घरात त्यांच्या आई आणि पत्नी दोघीच होत्या. सायंकाळी त्यांची आई दूध आणण्यासाठी घराबाहेर पडली. त्यावेळी भूषण यांची पत्नी आणि चिमुकली धृवांशी घरात होत्या. या गोष्टीचा फायदा घेत एक पंजाबी ड्रेस घातलेली अज्ञात महिला अचानक त्यांच्या घरात शिरली

दरम्यान, या अज्ञात महिलेने तीन महिन्याच्या निष्पाप चिमुकलीच्या आणि तिच्या आईच्या नाकाला रूमाल लावला. रुमाला गुंगीचे औषध लावलेले असल्याने आई बेशुद्ध झाल्यानंतर या क्रूर विकृतीच्या महिलेने घरातच पलंगावर झोपलेल्या तीन महिन्याच्या निष्पाप व निरागस चिमुकलीचा धारधार शस्त्राने गळा चिरला. काही वेळानंतर भूषण यांच्या आई दूध घेऊन घरी आल्या. त्यांनी आपल्या सूनेला बेशुद्ध अवस्थेत पडलेले बघितले. तर दुसरीकडे आपल्या तीन महिन्यांची नात रक्ताच्या थारोळ्यात पडलेली होती.आजीने समोरील दृश्य पाहिल्यानंतर आरडाओरड करून या घटनेची माहिती शेजाऱ्यांना दिली. त्यानंतर तातडीने धृवांशी आणि तिच्या आईला रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच धृवांशीचा दुर्देवी मृत्यू झाला होता. या घटनेची माहिती पोलिसांना दिल्यानंतर पोलिसांच पथक घटनास्थळी तात्काळ दाखल झालं ही हत्या कुठल्या कारणातून झाली आहे याबाबतचा तपास पोलीस करत असून मुलीच्या आईने एका महिलेवर संशय व्यक्त केला आहे.

COMMENTS