बीड : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते संग्राम जगताप यांनी मुस्लिम समाजाविषयी केलेल्या कथित वक्तव्यावरून राजकीय वातावरण तापले आहे. या पार्श्वभूमीवर बी

बीड : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते संग्राम जगताप यांनी मुस्लिम समाजाविषयी केलेल्या कथित वक्तव्यावरून राजकीय वातावरण तापले आहे. या पार्श्वभूमीवर बीड येथे हर्षवर्धन सपकाळ यांचा पुतळा जाळणार्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर माजी नगरसेवक शेख अमर यांनी सवाल उपस्थित केला आहे.
‘गुंगी’ म्हणजे काय, याचा अर्थ राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सांगावा. संग्राम जगताप मुस्लिम समाजाविषयी विष पसरवणारी वक्तव्ये करीत असताना त्यांच्याच पक्षातील कार्यकर्ते आणि पदाधिकारी गप्प का होते? त्या वेळी तुम्ही झोपले होते का? असा सवाल शेख अमर यांनी केला. मुस्लिम समाजाबद्दल तेढ निर्माण करणारी किंवा समाजामध्ये द्वेष वाढविणारी वक्तव्ये कोणत्याही राजकीय नेत्याने करू नयेत. अशा प्रकारच्या वक्तव्यांवर संबंधित पक्षाच्या कार्यकर्त्यांनी तसेच वरिष्ठ नेतृत्वाने स्पष्ट भूमिका घेणे गरजेचे आहे, असेही त्यांनी म्हटले.
राजकारण करताना समाजा-समाजात द्वेष निर्माण होईल, अशी भाषा टाळली पाहिजे. एखाद्या विरोधी पक्षातील नेत्याच्या वक्तव्यावर आक्रमक भूमिका घेणारे कार्यकर्ते आपल्या पक्षातील नेत्यांच्या वक्तव्यांवर मात्र मौन का बाळगतात, असा प्रश्नही शेख अमर यांनी उपस्थित केला. राजकीय मतभेद असले तरी सामाजिक सलोखा आणि जातीय-धार्मिक ऐक्य अबाधित राहणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी आपल्या नेत्यांच्या वक्तव्यांबाबत जबाबदारीची भूमिका घ्यावी, अशी अपेक्षाही शेख अमर यांनी व्यक्त केली.

COMMENTS