देवळाली प्रवरा : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती कृषी महाविद्यालय, पुणे येथे उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथील पदव्युत्तर महाविद्यालयाचे तांत्रिक अधिकारी व वरिष्ठ कीटकशास्त्रज्ञ डॉ. चांगदेव वायळ उपस्थित होते. यावेळी बोलताना डॉ. वायळ म्हणाले की, शंभर वर्षांपूर्वी बाबासाहेबांना वर्गात बसून शिक्षण घेण्याची संधी नाकारली जात होती. मात्र त्यांनी जिद्द, परिश्रम आणि बुद्धिमत्तेच्या जोरावर सर्व अडचणींवर मात करत जगातील नामांकित विद्यापीठांत उच्च शिक्षण घेतले आणि अनेक पदव्या संपादन केल्या. पुढे त्यांनी भारतीय राज्यघटनेची निर्मिती करून देशातील प्रत्येक नागरिकाला समान हक्क, अधिकार आणि न्याय मिळवून दिला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. महानंद माने होते. कार्यक्रमात डॉ. प्रविण खराडे, विद्यार्थिनी विभावरी वाकचौरे, प्रणाली चव्हाण तसेच विद्यार्थी अभयराज मेंढे आणि ऋतुराज भोसले यांनी मनोगते व्यक्त केली. राष्ट्रीय सेवा योजनेचे समन्वयक डॉ. सखेचंद अनारसे, कार्यक्रम अधिकारी डॉ. संगीता सालके, विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. पंकज रवंदळ, डॉ. संतोष मोरे यांच्यासह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यार्थी परिषदेचे उपाध्यक्ष डॉ. दत्तात्रय लाड यांनी केले, तर सूत्रसंचालन प्रियंका कोल्हे व गौरी रोडगे यांनी केले. “डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे देशासाठीचे योगदान” या विषयावर निबंध स्पर्धा घेण्यात आली. याचबरोबर वाचन दिनही साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचा समारोप डॉ. अशोक पाटील यांच्या आभार प्रदर्शनाने झाला.

देवळाली प्रवरा : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती कृषी महाविद्यालय, पुणे येथे उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथील पदव्युत्तर महाविद्यालयाचे तांत्रिक अधिकारी व वरिष्ठ कीटकशास्त्रज्ञ डॉ. चांगदेव वायळ उपस्थित होते.
यावेळी बोलताना डॉ. वायळ म्हणाले की, शंभर वर्षांपूर्वी बाबासाहेबांना वर्गात बसून शिक्षण घेण्याची संधी नाकारली जात होती. मात्र त्यांनी जिद्द, परिश्रम आणि बुद्धिमत्तेच्या जोरावर सर्व अडचणींवर मात करत जगातील नामांकित विद्यापीठांत उच्च शिक्षण घेतले आणि अनेक पदव्या संपादन केल्या. पुढे त्यांनी भारतीय राज्यघटनेची निर्मिती करून देशातील प्रत्येक नागरिकाला समान हक्क, अधिकार आणि न्याय मिळवून दिला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. महानंद माने होते.
कार्यक्रमात डॉ. प्रविण खराडे, विद्यार्थिनी विभावरी वाकचौरे, प्रणाली चव्हाण तसेच विद्यार्थी अभयराज मेंढे आणि ऋतुराज भोसले यांनी मनोगते व्यक्त केली. राष्ट्रीय सेवा योजनेचे समन्वयक डॉ. सखेचंद अनारसे, कार्यक्रम अधिकारी डॉ. संगीता सालके, विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. पंकज रवंदळ, डॉ. संतोष मोरे यांच्यासह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यार्थी परिषदेचे उपाध्यक्ष डॉ. दत्तात्रय लाड यांनी केले, तर सूत्रसंचालन प्रियंका कोल्हे व गौरी रोडगे यांनी केले. “डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे देशासाठीचे योगदान” या विषयावर निबंध स्पर्धा घेण्यात आली. याचबरोबर वाचन दिनही साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचा समारोप डॉ. अशोक पाटील यांच्या आभार प्रदर्शनाने झाला.

COMMENTS