Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांची ‘कम्प्युटर सायन्स हॅकॅथॉन’ स्पर्धेत चमक

अकोले : लीडरशिप फॉर इक्विटी आणि आदिवासी विकास विभागांतर्गत एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, राजूर यांच्या संयुक्त विद्यमाने मालपाणी रिसॉर्ट येथे १

निराधार महिलेला मिळाला निवारा; पाथर्डीत नगराध्यक्षांच्या पुढाकारातून उभारले छोटे घर
अशोक खरात प्रकरणात मोठे खुलासे होणार : माजी खा.डॉ.सुजय विखे 
तीन वर्षांत गुन्हेगारीवर मोठा लगाम; श्रीगोंदा पोलिसांची धडक कारवाई; २८७६ गुन्हे दाखल, २३९८ गुन्ह्यांची उकल

अकोले : लीडरशिप फॉर इक्विटी आणि आदिवासी विकास विभागांतर्गत एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, राजूर यांच्या संयुक्त विद्यमाने मालपाणी रिसॉर्ट येथे १२ मार्च रोजी एकदिवसीय कम्प्युटर सायन्स हॅकॅथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमात राजूर प्रकल्प कार्यालयांतर्गत सात आश्रमशाळांमधील ११ शिक्षक व ३३ विद्यार्थी सहभागी झाले होते.

आश्रमशाळेतील चौथी ते आठवीच्या आदिवासी विद्यार्थ्यांमध्ये संगणकीय विचारसरणी विकसित करणे, समस्या सोडवण्याची क्षमता, संवाद कौशल्य, तर्कशक्ती तसेच स्क्रॅच प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून ब्लॉक बेस्ड कोडींग कौशल्ये विकसित करणे हा या उपक्रमाचा उद्देश होता. राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० मध्ये नमूद करण्यात आलेल्या २१व्या शतकातील कौशल्यांशी हा उपक्रम सुसंगत असल्याचे आयोजकांनी सांगितले.

या स्पर्धेत शासकीय माध्यमिक आश्रम शाळा, जवळेबाळेश्वर यांनी प्रथम क्रमांक मिळवला. शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक कन्या आश्रम शाळा, पैठण यांनी द्वितीय क्रमांक, तर एकलव्य आदिवासी अनुदानित आश्रम शाळा, टाकळी यांनी तृतीय क्रमांक पटकावला. कार्यक्रमाच्या नियोजनासाठी प्रकल्प अधिकारी देवकन्या बोकडे तसेच सहाय्यक प्रकल्प अधिकारी दीपक कालेकर व आबासाहेब बागूल यांचे मार्गदर्शन लाभले.

COMMENTS