निर्बंध लादणारा फतवा

Homeताज्या बातम्यासंपादकीय

निर्बंध लादणारा फतवा

गुजरातमध्ये अहमदाबाद नगरपालिकेने काढलेला एक फतवा चांगलाच चर्चेत असून न्यायालयाने देखील या निर्णयाला चांगलेच फटकारले आहे. गुजरातमध्ये मांसाहार विकणार्

राज्यातील सत्तांतरांचे बुडबुडे !
अन्यथा मरण अटळ
नबावावरून बेबनाव

गुजरातमध्ये अहमदाबाद नगरपालिकेने काढलेला एक फतवा चांगलाच चर्चेत असून न्यायालयाने देखील या निर्णयाला चांगलेच फटकारले आहे. गुजरातमध्ये मांसाहार विकणार्‍या विक्रेत्यांच्या गाडया नगरपालिकेने हटवल्या. येथील रस्त्यांवर मांसाहारी पदार्थ विक्री करणार्‍या फेरीवाल्याविरुद्ध कारवाई केल्यानंतर आता हे प्रकरण हायकोर्टात गेले आहे. आम्ही काय खायचे आणि काय नाही, हे तुम्ही का ठरवता? असा सवालही अहमदाबाद नगरपालिकेला विचारला. 25 फेरीवाल्यांनी गुजरात हायकोर्टात याचिका दाखल केली असून त्यावर सुनावणी झाली.
आजचा मानव आधुनिक होत चालला असून, तो धार्मिकतेच्या आहारी गेला असला तरी, मनुष्याचा उगम झाला, तो मनुष्य हा केवळ शिकार करून आपली उपजीविका भागवत असे. मात्र मानव जस जसा प्रगत झाला, तसा तो शेती पिकवू लागला, अन्नधान्यांची निर्मिती करू लागला. भाजीपाला, डाळी, निसर्गातील फळांचा आहार तो घेऊ लागला. मात्र मनुष्य एकेकाळी शिकार करून केवळ मासांहारांचे अन्न घेत असे. याकडे सारासार दुर्लक्ष करून, काही तथाकथित धर्मांच्या ठेकेदारांनी आता मनुष्याने काय खावे आणि काय खावू नये, यावर निर्बंध लादण्यास सुरूवात केली आहे. तोच प्रकार गुजरातमधील अहमदाबाद नगरपालिकेने अवलंबला. रस्त्यावर मांसाहार विक्री करू नये, ते डोळयांना दिसतील अशा प्रकारे रस्त्यावर मांडू नये, अशा प्रकारच्या सूचना नगरपालिकेने केल्यानंतर फेरीवाल्यांनी उच्च न्यायालयाचे दार ठोठावले. यावेळी झालेल्या सुनावणीत न्यायालयाने नगरपालिकेचा चांगलेच फटकारले असून, भेद-भाव करणारे तुम्ही कोण, तुम्हाला हा अधिकार कुणी दिला, असा सवाल करत त्यांना चांगलेच फटकारले. सुनावणीवेळी न्यायमूर्ती वीरेन वैष्णव यांनी सरकारी वकिलांना म्हणाले, ‘नगरपालिकेला कुठल्या गोष्टीवर आक्षेप आहे, त्यांना नेमका कशाचा त्रास होतोय? तुम्हाला मांसाहार आवडत नाही, हे तुमचे व्यक्तिगत मत झाले. मी बाहेर काय खायचे आणि काय नाही, हे तुम्ही कसे काय ठरवू शकता? नगरपालिका आयुक्तांना तातडीने बोलावून घ्या आणि त्यांचा विचारा की ते नेमके काय करणार आहेत. उद्या ते म्हणतील मला मधुमेह आहे, तुम्ही उसाचा रस पिवू नका, कॉपी पिवू नका, आरोग्यसाठी चांगले नसते. ही तुमची मनमानी आहे का?’ याचिकाकर्त्यांनी गुजरात हायकोर्टात त्यांच्या गाड्या जप्त केल्याप्रकरणी याचिका दाखल केली. त्यावर सुनावणी झाली. याचिकाकर्त्यांच्या याचिकेत म्हटले होते, कुठल्याही सूचनेशिवाय, आदेशाशिवाय आमचे गाडे जप्त करण्यात आले. तसेच बडोदा, सूरत, भावनगर, जूनागढ़ आणि अहमदाबाद येथेही कारवाया सुरू आहेत. मागच्या महिन्यात राजकोटच्या महापौरांनी वादग्रस्त विधान केले होते. सत्य एवढेच आहे, की प्रत्येकाने आपापल्या आवडीनिवडीप्रमाणे आणि सत्याधारित आऱोग्यविचार लक्षात घेऊन आपापला आहार ठेवावा. अगदीच आवडत नसेल तर कुणीही कुणावरही काही खाण्याची सक्ती करू नये. तशीच आपल्याला आवडत नाही म्हणून दुसर्‍याने खाऊ नये अशी सक्तीही करू नये. आपल्या आवडीनिवडीला तात्विक रंग चढवू नयेत. गेंड्याच्या पाठीसारख्या धारणा ठेवून इतरांवर अनैतिकतेचे हेत्वारोप करू नयेत. दूध हे गायीचे रक्तच आहे वगैरे फालतू दाव्यांचे फालतूपण अनेकजण ओळखतात. मांसाहाराला हीन, क्रूर लेखण्याचा प्रकार याच फालतूपणाचे भावंड आहे. अन्नविषयक आवडनिवड ही पूर्णतः व्यक्तिसापेक्ष आहे हे शाकाहारवादी कट्टरांनी लक्षात घ्यायला हवे. स्वतःची जी काही खाद्यसंस्कृती आहे किंवा तत्वे आहेत ती आपल्यापुरती जपावीत. ती इतर लोकांवर काय आपल्या अजाण मुलांवरही लादण्याचा प्रयत्न करू नये. त्यामुळे अहमदाबाद उच्च न्यायालयाने नगरपालिकेला फटकारले ते योग्यच केले.

COMMENTS