Homeताज्या बातम्या

व्हॉट्सॲप, फेसबुक आणि इंस्टाच्या विशेष सुविधांसाठी मोजावे लागणार पैसे

नवी दिल्ली : सोशल मीडिया क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी 'मेटा'ने (Meta) आपल्या लोकप्रिय मंचांसाठी सशुल्क सदस्यता (Paid Subscription) योजना सुरू करण्य

गावच्या लेक-जावयांसाठी धोंडे जेवण; चौंडीत अनोखा सोहळा, ७०० लेक-जावई आणि हजारो नागरिकांनी घेतला महाप्रसादाचा आस्वाद
उष्णतेचा मोठा फटका; कर्जत तालुक्यात लाखो रुपयांचा कांदा सडला!
पारनेरमध्ये विशेष मार्गदर्शन शिबीर उत्साहात; विविध शासकीय योजनांची माहिती, दिव्यांग बांधवांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
Instagram, Facebook अन् WhatsApp वापरण्यासाठी आता पैसे मोजावे लागणार;  'META'ने सुरू केल्या सबस्क्रिप्शन-आधारित योजना! | Navarashtra

नवी दिल्ली : सोशल मीडिया क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी ‘मेटा’ने (Meta) आपल्या लोकप्रिय मंचांसाठी सशुल्क सदस्यता (Paid Subscription) योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या अंतर्गत फेसबुक, इंस्टाग्राम आणि व्हॉट्सॲपच्या काही विशेष सेवांचा लाभ घेण्यासाठी वापरकर्त्यांना मासिक शुल्क भरावे लागणार आहे.

कंपनीने ‘फेसबुक प्लस’, ‘इंस्टाग्राम प्लस’ आणि ‘व्हॉट्सॲप प्लस’ या नावांनी नव्या सदस्यता योजना जाहीर केल्या आहेत. या योजनांमधून वापरकर्त्यांना अतिरिक्त आणि प्रगत सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. फेसबुक प्लस आणि इंस्टाग्राम प्लससाठी दरमहा सुमारे ३.९९ अमेरिकन डॉलर, तर व्हॉट्सॲप प्लससाठी २.९९ अमेरिकन डॉलर इतके शुल्क प्रस्तावित करण्यात आले आहे. भारतीय वापरकर्त्यांसाठी या योजनांचे दर अद्याप जाहीर करण्यात आलेले नाहीत.

व्हॉट्सॲपच्या सशुल्क आवृत्तीत संदेशवहन अधिक वैयक्तिक आणि आकर्षक बनवण्यासाठी विविध सुविधा दिल्या जाणार आहेत. यामध्ये आवडीनुसार सजावट करता येणारी पार्श्वभूमी (Custom Background), विविध ध्वनीसूचना (Custom Notification Sounds), विशेष स्टिकर्स तसेच अधिक संवाद खिडक्या कायमस्वरूपी वर ठेवण्याची (Chat Pinning) सुविधा उपलब्ध होणार असल्याची माहिती समोर आली आहे. सध्या केवळ तीन संवाद खिडक्या वर ठेवण्याची (Pin करण्याची) सुविधा उपलब्ध आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून फेसबुक, इंस्टाग्राम आणि व्हॉट्सॲप या सेवा सर्वसामान्यांसाठी मोफत उपलब्ध होत्या. या माध्यमांमधून मिळणारा जाहिरात महसूल आणि वापरकर्त्यांच्या माहितीवर आधारित व्यावसायिक मॉडेलमुळे कंपन्यांना मोठा आर्थिक लाभ मिळत होता, मात्र आता कंपनी उत्पन्नाचे नवे स्रोत शोधत आहे.

COMMENTS