Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कोपरगावमध्ये डिझेल चोरी करणारे जेरबंद

कोपरगाव प्रतिनिधी ः  कोळपेवाडी येथील सिध्देश्‍वर ग्रामीण पतसंस्थेसमोरून चांगदेव साहेबराव कदम चालक असलेल्या स्कुल बस क्रमांक एमएच 17 ओ वाय 9328 ही

क्रांतीवीर राघोजी भांगरे यांचे स्मारक हा यथोचित सन्मान : शरद पवार | DAINIK LOKMNTHAN
थकबाकीदार विनायक बोगा यांनी खोटा चेक दिल्याने कारावासाची शिक्षा
पाटबंधारे विभागाने शेतक-यांचा अंत पाहु नका ; अन्यथा शेतकरी रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही : कोल्हे

कोपरगाव प्रतिनिधी ः  कोळपेवाडी येथील सिध्देश्‍वर ग्रामीण पतसंस्थेसमोरून चांगदेव साहेबराव कदम चालक असलेल्या स्कुल बस क्रमांक एमएच 17 ओ वाय 9328 ही उभी केलेली असताना कोणीतरी अज्ञात चोरटयांनी तिच्या डिझेल टाकीतील 6900 रुपये किमतीचे 75 लिटर डिझेल स्वतःच्या शुक्रवार 24 मार्च रोजी आर्थिक फायदयासाठी चोरून नेले असल्याच्या फिर्यादीवरुन कोपरगाव तालुका पोलिस स्टेशनमध्ये  गुन्हा रजिस्टर नंबर 162/2023 भा.द.वि.क. 379.411.34 प्रमाणे दाखल करत ग्रामीण पोलिसांनी तपास सुरू केला होता.
सदर गुन्हयाचा तपास पोलिस करत असताना गुप्त बातमीदामार्फत सदर गुन्हयातील डिझेल चोरी करणारे आरोपी बाबत खात्रीशिर माहिती मिळाल्याने, कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस पथक व उपविभागीय पोलीस अधिकारी शिर्डी विभाग यांचे पथक यांनी मिळालेल्या माहितीचे आधारे आरोपी अमोल अविनाश कुंदे (वय 19 वर्षे रा. एकरुखे ता. राहाता) याचा शोध घेतला असता  तो मिळुन आला. त्याचेकडे गुन्हयाबाबत चौकशी केली तेव्हा त्याने डिझेल चोरीची कबुली देवून  चोरी केलेल्या मालमत्तेपैकी काही मालमत्ता साथीदार रविंद्र उर्फ भगवान भिकाजी भातकु (रा. भातकुटे वस्ती राहाता) यांस विकली असल्याचे सांगीतल्यावरुन तात्काळ त्यास अटक करण्यात आली असून, त्याने 9706 रुपये किंमतीचे 105 लिटर डिझेल भरलेले निळे रंगाचे 3 ड्रम काढून दिले आहे. अशा प्रकारे डिझेल चोरीचा गुन्हा पोलीस पथकाने उघडकीस आणला आहे. सदरची कौतुकास्पद कामगीरी  पोलीस अधिक्षक  राकेश ओला, अपर पोलीस अधिक्षक स्वाती भोर, उपविभागीय पोलीस अधिकारी संजय सातव यांचे मार्गदर्शनाखाली कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक वासुदेव देसले, पोलीस उपनिरीक्षक तुषार धाकराव, पो.ना. विलास कोकाटे, पो.ना. किसन सानप, पो.कॉ. रशिद शेख,  शिर्डी उपविभागीय पोलिस पथकातील पो.हे.काँ इरफान शेख, पो.ना. कृष्णा कुन्हे, पो.ना. शिंदे यांनी केली आहे. सदर आरोपींनी अशाच प्रकारचं डिझेल चोरीचे गुन्हे केले आहे अगर कसे? याबाबत पुढील तपास पोलीस कसोशीने करत आहेत.

COMMENTS