Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

प्रतीक्षा भांगरे बुद्धीमापन स्पर्धेत राज्यात द्वितीय

अकोले/प्रतिनिधी ः इमॅजिन सोल्युशन संस्थेतर्फे महाराष्ट्रातील सर्व एकलव्य रेसिडेन्सीयल पब्लिक स्कुल मध्ये शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांसाठी बुध्द

कोपरगावात कोरडा दुष्काळ जाहीर करा ः आ. आशुतोष काळेंची शासनाकडे मागणी
अतिवृष्टीच्या नुकसानीचे पहिल्या हफ्त्याचे ३ कोटी मंजूर : आ. आशुतोष काळे
कैलास गिरवले मृत्यूप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करा : शेख यांची मागणी

अकोले/प्रतिनिधी ः इमॅजिन सोल्युशन संस्थेतर्फे महाराष्ट्रातील सर्व एकलव्य रेसिडेन्सीयल पब्लिक स्कुल मध्ये शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांसाठी बुध्दीमापन स्पर्धेचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. सदर स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा शनिवार 01 एप्रिल रोजी मवेशी ता.अकोले.जि.अ.नगर येथील शैक्षणिक संकुलात एकलव्यचे प्राचार्य डॉ. देवीदास राजगिरे यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झाला. कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून इमॅजिन सोल्युशन संस्थेचे प्रमुख विपिन शर्मा,आदर्शचे कुलप्रमुख भाऊसाहेब खरसे, मवेशी इंग्रजी माध्यमचे मुख्याध्यापक आदिनाथ सुतार आश्रम शाळेचे मुख्याध्यापक शिवराज कदम व शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा श्रीमती ताराबाई भांगरे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
कार्यक्रमात विपिन शर्मा,आपल्या  प्रमुख भाषणात म्हणाले की,शाळा पातळीवर आयोजित करण्यात येणार्‍या विविध शैक्षणिक उपक्रमात विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन आपल्या व्यक्तिमत्त्वाचा विकास साधने आवश्यक असून कला, साहित्य, संगीत, सांस्कृतिक व्यक्तिमत्त्वाची पायाभरणी शाळापातळीवरच होत असते. त्यामुळे विविध स्पर्धेत मुलांनी सहभाग घेऊन स्वत:ला सिध्द करणे काळाची गरज असल्याचे प्रतिपादन शर्मा यांनी आपल्या भाषणात सांगितले.  इमॅजिन सोल्युशन संस्था पुणे व्दारा आयोजित राज्यस्तरीय बुध्दीमापन स्पर्धेत एकलव्य मॉडेल रेसिडेन्शिअल स्कूल मवेशीच्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय स्तरावरील बुद्धिमापन स्पर्धेत घवघवीत यश संपादन केल्याबद्दल शाळेचे प्राचार्य डॉ. देवीदास राजगिरे यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. कु. प्रतीक्षा भांगरे या विद्यार्थिनीने इमॅजिन स्पर्धेत महाराष्ट्रात द्वितीय क्रमांक मिळवला ही गोष्ट आमची मान उंचावणारी आहे.अशा विविध स्पर्धांमध्ये विद्यार्थी जेव्हा यश मिळवतात तेव्हा खर्‍या अर्थाने शिक्षक म्हणून आम्हा सर्वांना त्याचा खूप अभिमान वाटतो. हे विद्यार्थी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत कष्टाने, जिद्दीने, मेहनतीने यश संपादन करतात ही गोष्ट आमच्या सर्व शिक्षकांसाठी अभिमानास्पद आहे असेही डॉ. राजगिरे आपल्या अध्यक्षीय भाषणात शेवटी म्हणाले. बुध्दीमापन स्पर्धेत या शाळेतील एकूण 103 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. बक्षीस वितरण व नवीन शैक्षनिक वर्षाची सुरुवात आशा दोन कार्यक्रमाचे आयोजन अतिशय सुंदर असे करण्यात आले होते.कार्यक्रमात यावेळी नवीन शैक्षणिक वर्षात प्रवेश करणार्‍या विद्यार्थ्यांना इमॅजिनचे प्रमुख श्री.विपिन शर्मा यांनी  पुढील वाटचालीसाठी व नवीन शैक्षणिक वर्षासाठी मुलांना शुभेच्छा दिल्या. सदर स्पर्धेतील बक्षीसपात्र विद्यार्थी प्रतीक्षा सोनू भांगरे -महाराष्ट्र राज्यात द्वितीय (32इंच एलईडी टीव्ही संच), प्रशांत अशोक धराडे  1000/-, कु.वसुंधरा संजय भांगरे 700/-, कु.अंकिता अशोक सुरकुले  500/-, याप्रमाणे शाळेला बक्षीस मिळाले आहे.

COMMENTS