Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

भाजप नेत्या चित्रा वाघ अडचणीत

अभिनेता नयानी यांचा खटला दाखल करण्याचा इशारा

मुंबई ः उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाने तयार केलेल्या एका जाहिरातीत अभिनय करणार्‍या प्याराली नयानी यांना पॉर्न स्टार म्हणून भाजप नेत्या चित

महाराष्ट्रातही ’लव्ह जिहाद’ विरोधी कायदा हवा – चित्रा वाघ
असले पत्रकार सुपारी घेऊन प्रश्न विचारतात…
चॅनलमधील पत्रकार मुली साडी का नाही नेसत ? – सुप्रिया सुळे

मुंबई ः उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाने तयार केलेल्या एका जाहिरातीत अभिनय करणार्‍या प्याराली नयानी यांना पॉर्न स्टार म्हणून भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी खिल्ली उडवली होती. मात्र याप्रकरणी चित्रा वाघ यांच्यासमोरील अडचणी वाढण्याची शक्यता आहे. कारण चित्रा वाघ यांनी आपल्या वक्तव्याबद्दल माफी न मागितल्यास त्यांच्या विरोधात मानहानीचा खटला दाखल करण्याचा इशारा नयानी यांनी दिला आहे.
लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने एक जाहिरात बनवली आहे. मोदींची भलामण करणार्‍या एका जाहिरातीचे विडंबन ठाकरेंच्या शिवसेनेच्या जाहिरातून करण्यात आले आहे. ’वॉर रुकवा दी पापा’ असे या जाहिरातीचं शीर्षक आहे. अभिनेते प्याराली नयानी यांनी या जाहिरातीत अभिनय केला आहे. ही जाहिरात प्रसिद्ध होताच चित्रा वाघ यांनी पत्रकार परिषद घेऊन नयानी हे पॉर्न स्टार असल्याचा दावा केला होता. त्यांच्या या वक्तव्यानंतर प्याराली नयानी हे संतापले आहेत. प्याराली नयानी यांनी एक व्हिडिओ प्रसिद्ध करून आपली भूमिका मांडली आहे. चित्रा वाघ यांनी माफी मागावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. अन्यथा आपण अबु्रनुकसानीचा खटला दाखल करू असा इशाराच नयानी यांनी दिला आहे.

COMMENTS