Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

थकबाकीदार विनायक बोगा यांनी खोटा चेक दिल्याने कारावासाची शिक्षा

कोपरगाव प्रतिनिधी ः कोपरगाव येथील समता नागरी सहकारी पतसंस्था मर्या, कोपरगांव शाखा- अहमदनगर यांचेकडुन कर्जदार विनायक काशिनाथ बोंगा यांनी घेतलेल्या

पृथ्वी असेपर्यंत छत्रपती शिवरायांचा अवमान करण्याची हिंमत होऊ नये बावनकुळे यांची अपेक्षा
खतांच्या वाढीव किमती तातडीने कमी करा ; शेतकरी मराठा महासंघाची मागणी
अभिनेत्री शिल्पा शेट्टीने घेतले शनिदर्शन

कोपरगाव प्रतिनिधी ः कोपरगाव येथील समता नागरी सहकारी पतसंस्था मर्या, कोपरगांव शाखा- अहमदनगर यांचेकडुन कर्जदार विनायक काशिनाथ बोंगा यांनी घेतलेल्या कर्जाचे परतफेडीपोटी पतसंस्थेला दिलेला 1 लाख 17 हजार व 82 हजार रुपयांचा चेक न पटल्याने पतसंस्थेने त्यांचेवर रितसर अहमदनगर येथील फौजदारी न्यायालयात एस.सी.सी.नं. 3932/2021 व एस.सी.सी.नं. 3539/2021 फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 च्या कलम 255 (02) व निगोशिएबल इन्स्ट्युमेंट अ‍ॅक्ट 1881 चे कलम 138 खाली फौजदारी कारवाई केली. त्यात चौकशीअंती आरोपी विनायक काशिनाथ बोगा यांनी गुन्ह केल्याचे सिध्द झाल्याने अहमदनगर येथील मे. ज्युडीशिअल मॅजिस्ट्रेट साहेब यांनी आरोपीस 6 महिने कारावासाची शिक्षा ठोठावली.
फिर्यादी समता नागरी सहकारी पतसंस्था मर्या, कोपरगांव शाखा अहमदनगर यांना थकबाकीदार बोगा यांनी एकुण रु.2,15,000/- लाखाची नुकसान भरपाई देण्याचा आदेश केला. पतसंस्थेस नुकसान भरपाई देण्यात कसुर केल्यास आरोपीस आणखी अधिक 1 महिन्याची कारावासाची शिक्षा सुनावली आहे. याकामी समता नागरी सहकारी पतसंस्था मर्या कोपरगांव यांचेतर्फे अ‍ॅड. वृषाली तांदळे व शाखाधिकारी नरेश गुंजाळ यांनी कामकाज पाहिले. कर्जदारांनी कोणत्याही पतसंस्थेस दिलेले चेक पास करावेत अन्यथा अशा प्रकरची शिक्षा होऊन तुरुंगवासाची वेळ येऊ शकते यांचे भान ठेवावे. महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 व नियम 1961 मधील कलम 101 कलम 156 हे देखील अतिशय कठोर कायदे सहकारातील आहेत. जप्तीला उशीर लागला तर आज ना उदया पैसे भरावेच लागतात देणे चुकत नाही. त्यामुळे कर्जदारांना वेळेत व्याज भरून रिबेटच्या फायदा घ्यावा असे उद्गार समता नागरी सहकारी पतसंस्थेचे असि. जनरल मॅनेजर (वसुली विभाग) जनार्दन कदम यांनी केले.

COMMENTS