Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

विधानपरिषदेचा शतकोत्तर महोत्सव संस्मरणीय व्हावा ः डॉ. नीलम गोर्‍हे

मुंबई : महाराष्ट्र विधानपरिषदेचा शतकोत्तर महोत्सव परिसंवाद, प्रदर्शने, संदर्भसमृद्ध प्रकाशने याद्वारे संस्मरणीय ठरेल, अशा पद्धतीने साजरा करण्यात

LIVE मुख्यमंत्री.. बारामती इनक्युबेशन आणि इनोव्हेशन सेंटरचे उद्घाटन
सोशल मीडियावर जातीवाचक पोस्ट टाकणे पडले महागात
 मतदार नोंदणीसाठी पुणे जिल्ह्याचे काम वाखाणण्याजोगे – अजमेरा

मुंबई : महाराष्ट्र विधानपरिषदेचा शतकोत्तर महोत्सव परिसंवाद, प्रदर्शने, संदर्भसमृद्ध प्रकाशने याद्वारे संस्मरणीय ठरेल, अशा पद्धतीने साजरा करण्यात यावा. माजी ज्येष्ठ सदस्यांनाही या ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार होता यावे यासाठी विभागस्तरावर देखील कार्यक्रमांचे आयोजन करण्यात यावे, अशी सूचना विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोर्‍हे आणि संसदीय कार्य मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली.
विधानपरिषदेचा शतकोत्तर महोत्सव विविध उपक्रमांनी साजरा करण्यासंदर्भात विचार-विनिमय आणि नियोजनासाठी उपसभापती डॉ. गोर्‍हे यांनी विधानपरिषदेतील गटनेते आणि सदस्यांची बैठक विधानभवनात बैठक घेतली. यावेळी, माजी सदस्यांना विनंती पत्रे पाठवून त्यांच्याकडून विधानपरिषदेसंदर्भातील महत्त्वपूर्ण घटना आणि छायाचित्रे मागविणे, देशातील अन्य राज्यांमधील विधानपरिषद सदस्यांना चर्चा-परिसंवादासाठी निमंत्रित करणे, कायदानिर्मितीच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण चर्चा, संदर्भांचे संकलन पुस्तक स्वरूपात करणे, वरिष्ठ सभागृहाची आवश्यकता आणि योगदान यासंदर्भातील मान्यवरांचे लेख, सभागृहातील चर्चा इत्यादींचे संदर्भ संकलित आणि संपादित करणे, या शतकोत्तर महोत्सव उपक्रमांमध्ये समाजातील विविध घटकांना सहभागी करून घेणे, निवृत्त सदस्यांना निरोप देतानाच्या छायाचित्रांचे पुस्तक स्वरूपात संकलन करणे, माहितीपट निर्मिती इत्यादी सूचना याबैठकीत गटनेते आणि सदस्यांनी मांडल्या. या सूचना स्वीकारण्यात येऊन विषयांनुसार समिती नेमण्यात येऊन पुढील कार्यवाही करण्यात येईल, असे उपसभापती डॉ. नीलम गोर्‍हे आणि संसदीय कार्य मंत्री चंद्रकांत पाटील यांनी निश्‍चित केले.

COMMENTS