अहिल्यानगर : महापालिका कंत्राटी कर्मचारी धीरज कचरुसिंग परदेशी यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्यांनंतर उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याने अहि

अहिल्यानगर : महापालिका कंत्राटी कर्मचारी धीरज कचरुसिंग परदेशी यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्यांनंतर उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याने अहिल्यानगर शहरात दुसऱ्या दिवशी कडकडीत बंद पाळण्यात आला. हल्लेखोरांना कठोरात कठोर शिक्षा व्हावी या मागणीसाठी बंदची हाक देण्यात आली होती.
शहर बंदला शहरातील व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बंद ठेवत बंदमध्ये सहभाग नोंदवला. त्यामुळे शहरातील माळीवाडा, तोफखाना, भिंगार, केडगावसह प्रमुख बाजारपेठांमध्ये दिवसभर शुकशुकाट होता. एसटी, ऑटो आणि खाजगी वाहतूकही ठप्प राहिली. कापडबाजार, माणिक चौक येथील सर्व दुकाने बंद होती. खबरदारी म्हणून शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्यात आली होती. दरम्यान पोलीस यंत्रणा हाय अलर्टवर असून कुठेही तणाव निर्माण होणार नाही याकडे लक्ष देऊन होते.

COMMENTS