Homeताज्या बातम्या

रेणुकामातेच्या चरणी भाविकांचे ८७ लाख ७६ हजारांचे भरभरून दान

माहूर : माहूर गडावरील श्री रेणुकामाता मंदिरात भाविकांची श्रद्धा पुन्हा एकदा दानाच्या रूपाने अधोरेखित झाली आहे. रेणुकामातेच्या चरणी भाविकांनी अर्प

‘उमेद’च्या माध्यमातून राज्यात १ कोटी ‘लखपती दीदी’ संकल्प अभियान; शासन निर्णय जारी
पारधी समाजातील महिलेवर जीवघेणा हल्ला; विनयभंग, लूट व बलात्काराच्या प्रयत्नाचा आरोप
नांदेडमध्ये ‘शब्द शब्द तुझाच आहे’ कवितासंग्रहाचे 7 जून रोजी प्रकाशन
Nanded News donations to Renuka Mata of Mahur 22 lakh rupees were deposited  | Nanded News: माहूरच्या रेणुका मातेला भक्तांनी दिलं भरभरून दान, दानपेटीत  एका महिन्यात तब्बल 22 लाख ...

माहूर : माहूर गडावरील श्री रेणुकामाता मंदिरात भाविकांची श्रद्धा पुन्हा एकदा दानाच्या रूपाने अधोरेखित झाली आहे. रेणुकामातेच्या चरणी भाविकांनी अर्पण केलेल्या दानातून तब्बल ८७ लाख ७६ हजार २६४ रुपयांची रक्कम प्राप्त झाली आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणात रोकड, सोने-चांदी तसेच विदेशी चलनाचा समावेश आहे. त्यामुळे श्री रेणुकादेवी संस्थानच्या उत्पन्नात मोठी भर पडली आहे.

दि. २० जून रोजी सीलबंद करून ठेवण्यात आलेल्या मंदिरातील एकूण ११ दानपेट्या शुक्रवार, दि. ७ ऑगस्ट रोजी संस्थानचे पदाधिकारी तसेच धर्मादाय विभागाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत उघडण्यात आल्या. या दानपेट्यांची अधिकृतपणे मोजणी करण्यात आली. यावेळी दानपेट्यांमधून २५ लाख ९९ हजार १६५ रुपये रोख प्राप्त झाले. रेणुकामाता मंदिराच्या सभामंडपातील चार, महालक्ष्मी माता मंदिरातील एक, तुळजाभवानी माता मंदिरातील एक, मंदिर परिसरातील दोन आणि परशुराम मंदिराकडील तीन अशा एकूण ११ दानपेट्यांचा यात समावेश होता. दानपेट्यांमध्ये भाविकांनी अर्पण केलेल्या मौल्यवान धातूंची संस्थानच्या अधिकृत सोनाराकडून पारख करण्यात आली. यामध्ये ९३३ ग्रॅम ३५० मिली सोने आढळले. त्यात सोन्याच्या दागिन्यांसह १९ सोन्याच्या नथींचाही समावेश आहे. तसेच १ किलो ८६२ ग्रॅम ८८० मिली चांदी मिळाली. याशिवाय परशुराम पाळण्यातील स्वतंत्र दानामध्ये १ किलो ९ ग्रॅम ८०० मिली चांदी असल्याची नोंद करण्यात आली.

भाविकांनी भारतीय चलनासोबत विदेशी चलनही अर्पण केले असून, दानपेट्यांमध्ये १२० अमेरिकन डॉलर, ५ सौदी रियाल आणि एक विदेशी नाणे आढळले. दि. २१ जून ते ७ ऑगस्ट या कालावधीत संस्थानला विविध माध्यमांतूनही मोठ्या प्रमाणात उत्पन्न प्राप्त झाले. देणगी विभागातून २५ लाख ८० हजार ६५७ रुपये, साडी-पातळ विक्रीतून १९ लाख ६१ हजार ५०५ रुपये, ऑनलाइन देणगीतून ११ लाख ७६ हजार ४०२ रुपये, तर ऑनलाइन साडी-पातळ विक्रीतून ४ लाख ५८ हजार ५३५ रुपये प्राप्त झाले. तसेच पावतीद्वारे प्राप्त पिवळ्या-पांढऱ्या धातूंच्या दानामध्ये २० ग्रॅम १६० मिली सोने आणि ६५७ ग्रॅम ५०० मिली चांदी असल्याची नोंद करण्यात आली आहे. या सर्व बाबींची एकत्रित रक्कम ८७ लाख ७६ हजार २६४ रुपये इतकी असल्याचे संस्थानकडून सांगण्यात आले.

दानपेट्या उघडून मोजणी करण्याच्या प्रक्रियेदरम्यान संस्थानच्या अध्यक्ष हिराका. शेळके, धर्मादाय सहआयुक्त नांदेड, कोषाध्यक्ष अभिजीत जगताप, तहसीलदार माहूर, विश्वस्त चंद्रकांत भोपी, संजय काण्णव, अरविंद देव, बालाजी जगत, धर्मादाय सहआयुक्त कार्यालयाचे निरीक्षक बाळासाहेब गंगावने, व्यवस्थापक विजय राऊत, लेखापाल योगेश साबळे, सुरक्षा अधिकारी महादेव मुंडे आदी उपस्थित होते. संस्थानचे अधिकृत सोनार सुशिल प्रल्हादराव टाक यांनी दानपेट्यांमधून प्राप्त झालेल्या सोन्या-चांदीच्या वस्तूंची पारख केली. संपूर्ण प्रक्रिया अधिकृत व्यक्तींच्या उपस्थितीत करण्यात आली.

माहूरच्या रेणुकामातेवर महाराष्ट्रासह देशभरातील भाविकांची मोठी श्रद्धा आहे. विविध सण, उत्सव आणि धार्मिक पर्वांच्या काळात भाविक मोठ्या संख्येने माहूर गडावर दर्शनासाठी येतात. त्यातून संस्थानला मिळणाऱ्या देणगीतही मोठी वाढ होत असते. यावेळी दानपेट्यांमधून प्राप्त झालेली रोकड, सोने-चांदी आणि विदेशी चलन पाहता भाविकांची रेणुकामातेवरील श्रद्धा पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. या दानामुळे श्री रेणुकादेवी संस्थानच्या उत्पन्नात मोठी भर पडली असून, संस्थानच्या विविध धार्मिक व सामाजिक उपक्रमांसाठी त्याचा उपयोग होणार आहे.

COMMENTS