Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पोलीस उपायुक्त कराड यांना राष्ट्रपती पुरस्कार

 शेवगाव : तालुक्याचे भूमिपुत्र व ढोरजळगाव येथील रहिवासी, सध्या मुंबई येथे सायबर क्राइम विभागात पोलीस उपायुक्त पदावर कार्यरत असलेले पुरुषोत्तम नारा

शेवगामध्ये ट्रकच्या चाकाखाली चिरडून दोघांचा मृत्यू
लोकसहभागातून जलक्रांती! बालमटाकळीत ९६० मीटर लांबीच्या बंधाऱ्याचे खोलीकरण सुरू
शेअर्स फसवणूक प्रकरणातील शंकर शिंदेचा जामीन नाकारला

 शेवगाव : तालुक्याचे भूमिपुत्र व ढोरजळगाव येथील रहिवासी, सध्या मुंबई येथे सायबर क्राइम विभागात पोलीस उपायुक्त पदावर कार्यरत असलेले पुरुषोत्तम नारायण कराड यांना गुणवत्तापूर्ण सेवा व उत्कृष्ट कामगिरीबद्दल सर्वोच्च राष्ट्रपती पुरस्कार जाहीर झाला आहे. हा मानाचा पुरस्कार प्रजासत्ताक दिनानिमित्त नवी दिल्ली येथे प्रदान करण्यात येणार आहे.

शेतकरी कुटुंबातून आलेल्या पुरुषोत्तम कराड यांनी कठोर परिश्रम, जिद्द व प्रामाणिकपणाच्या बळावर लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून २००२ साली पोलीस उपअधीक्षक म्हणून सेवेत प्रवेश केला. सेवाकाळात त्यांनी राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये कार्यरत राहून कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे.

 गुन्हेगारी नियंत्रण, जनतेशी थेट संवाद, तक्रार निवारण, महिला व बालसुरक्षेसाठी प्रभावी उपाययोजना तसेच आपत्ती व्यवस्थापनाच्या काळात दाखवलेली तत्परता विशेष उल्लेखनीय ठरली आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली अनेक संवेदनशील व गुंतागुंतीच्या प्रकरणांचा यशस्वी तपास करण्यात आला असून, त्यामुळे पोलीस दलावरील जनतेचा विश्वास अधिक दृढ झाला आहे.

कर्तव्यदक्ष, शिस्तप्रिय आणि जनसामान्यांशी आपुलकीने वागणारे अधिकारी म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांच्या या उत्कृष्ट सेवेची दखल घेऊन केंद्र सरकारने त्यांना राष्ट्रपती पुरस्काराने सन्मानित करण्याचा निर्णय घेतला आहे.

या निवडीमुळे शेवगाव तालुका, ढोरजळगाव गावासह संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यात आनंदाचे वातावरण पसरले असून सर्व स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

COMMENTS