Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

किनवट: सु-संस्कार निवासी मतिमंद विद्यालयात कायदेविषयक जनजागृती शिबिर संपन्न

किनवट : गोकुंदा येथील सु-संस्कार निवासी मतिमंद विद्यालयात तालुका विधी सेवा समितीच्या वतीने नुकतेच एका विशेष कायदेविषयक जनजागृती शिबिराचे आयोजन कर

किनवटचे रणरणते ऊन आणि व्यवस्थेची कसोटी; नोंदणीसाठी बळीराजाचा मुक्काम आता पदपथावर!
किनवटच्या दुर्गम आदिवासी पाड्यांचा वनवास संपणार? रस्ते मंजुरीचे प्रस्ताव राज्य शासनाच्या दरबारी!प्रशासकीय हालचालींना वेग; ’मुख्यमंत्री ग्रामसडक’ आणि ’आदिवासी उपयोजने’तून निधीची प्रतीक्षा
किनवटमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहात साजरी; भीम अनुयायांचा जनसागर

किनवट : गोकुंदा येथील सु-संस्कार निवासी मतिमंद विद्यालयात तालुका विधी सेवा समितीच्या वतीने नुकतेच एका विशेष कायदेविषयक जनजागृती शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. दिव्यांग विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांना कायद्याची माहिती मिळावी आणि त्यांच्या हक्कांप्रति जागरूकता निर्माण व्हावी, या उद्देशाने हे शिबिर घेण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष तथा दिवाणी न्यायाधीश पी. एम. माने होते. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून ड. दिपा सोनकांबळे यांनी उपस्थितांशी संवाद साधला. त्यांनी यावेळी विशेषतः दिव्यांग विद्यार्थ्यांचे कायदेशीर हक्क,शिक्षणासंदर्भातील तरतुदी आणि संरक्षण, शासकीय योजना आणि सुविधा. या विषयांवर अत्यंत सोप्या भाषेत मार्गदर्शन केले. यावेळी वकील संघाचे उपाध्यक्ष टी. आर. चव्हाण यांच्यासह वकील मंडळातील डी. जी. काळे, पी. पी. गावंडे, विलास शामीले, पी. जी. घुले आणि बी. बी. कानींदे यांची प्रमुख उपस्थिती होती. केवळ कायदेविषयक चर्चाच नव्हे, तर या निमित्ताने विद्यार्थ्यांसाठी आनंदाची मेजवानीही आयोजित करण्यात आली होती. शिबिरादरम्यान विद्यार्थ्यांना फळांचे वाटप करण्यात आले, तर पालकांसाठी मिष्ठान्न भोजनाची विशेष व्यवस्था करण्यात आली होती. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये चैतन्याचे वातावरण पाहायला मिळाले. शिबिराच्या यशस्वीतेसाठी शाळेचे मुख्याध्यापक  वायकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली शिंदे, केशव डहाके आणि अस्वले यांनी परिश्रम घेतले. तसेच शिक्षकेत्तर कर्मचारी श्रीमती जाधव, मनोहरे, ढगे, आईटवार, अमृते,  बिरादार, कदम आणि पांढरे यांनी मोलाचे सहकार्य केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तोडकर यांनी केले, तर उपस्थितांचे आभार मुख्याध्यापक वायकुळे यांनी मानले. या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

COMMENTS