Homeताज्या बातम्या

चौसाळा शहर व ग्रामीण भागात शिवसेनेचा पक्षबांधणी दौरा; उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचा निर्धार

बीड - शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार बीड विधानसभा मतदारसंघातील बी.एल.ए.चा आढावा, पक्षबांधणी तसेच शिवसेना पदाधिकारी व शिवस

कुंभमेळ्याच्या २२७० कोटींच्या टेंडर घोटाळ्यानंतर ५०० कोटींचा बनावट टेंडर घोटाळा उघडकीस
परळी पंचायत समिती कार्यालयात स्व. अजितदादा पवार यांना विनम्र अभिवादन! विकास व जनसेवेतील योगदान सदैव प्रेरणादायी: राजवर्धन भोसले
अतिक्रमण हटविण्याच्या निर्देशाने धाबे दणाणले; मुदत संपण्यापूर्वीच जागा खाली करण्याची लगबग

बीड – शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार बीड विधानसभा मतदारसंघातील बी.एल.ए.चा आढावा, पक्षबांधणी तसेच शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिकांच्या गाठीभेटी घेण्यासाठी बीड-माजलगाव विधानसभा मतदारसंघाचे संपर्कप्रमुख शेख मुजीब भाई आणि जिल्हाप्रमुख गणेशभाऊ वरेकर यांचा ग्रामीण दौरा सुरू आहे. 8 ऑगस्ट ते 11 ऑगस्ट 2026 या कालावधीत हा दौरा आयोजित करण्यात आला आहे. या दौर्‍यादरम्यान आज बीड तालुक्यातील चौसाळा शहर व ग्रामीण भागातील शिवसेना पदाधिकारी आणि शिवसैनिकांच्या भेटी घेण्यात आल्या. यावेळी पक्षबांधणीबाबत चर्चा करून स्थानिक पातळीवरील संघटनात्मक परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. तसेच शिवसैनिकांच्या विविध अडचणी जाणून घेत त्यावर मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी शिवसैनिकांनी आपल्या विविध अडचणी व समस्या पदाधिकार्‍यांसमोर मांडल्या. तसेच आपण सर्वजण शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत, असा विश्वास उपस्थित पदाधिकारी व शिवसैनिकांनी व्यक्त केला. या दौर्‍यात तालुकाप्रमुख गोरख अण्णा सिंघन, युवासेना उपजिल्हाप्रमुख अशफाक शेख यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी कोंडिराम जोगदंड, शहदेव जोगदंड, श्रीमंत सोनवणे, अजम शेख, अशोक नाईकवाडे, शैलेशदादा सोनवणे, अनिल टाके, आजिनाथ नाईकवाडे, प्रदीप कुचेकर, सलीम शेख, प्रविण विंब, विशाल सोनवणे, साहेबराव काटे, बाबासाहेब गाडेकर, निसार मोमीन, इलियास मुलानी यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसैनिक व पदाधिकारी उपस्थित होते.

COMMENTS