केडगावच्या दोघांची पोलिसांनी केली चौकशी ; पत्रकार बोठेला मदत केल्याचा संशय

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

केडगावच्या दोघांची पोलिसांनी केली चौकशी ; पत्रकार बोठेला मदत केल्याचा संशय

यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्ष रेखा जरे हत्याकांडामध्ये मुख्य सूत्रधार असलेला दैनिक सकाळचा कार्यकारी संपादक बाळ ज.

दिल्लीत 20 वर्षीय महिलेवर सामूहिक बलात्कार
कोपरगावातील जनावरे बाजार सोमवारी बंद
मुळा धरणाकडे जाणार्‍या रस्त्याचे भाग्य उजळणार

अहमदनगर/प्रतिनिधी- यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्ष रेखा जरे हत्याकांडामध्ये मुख्य सूत्रधार असलेला दैनिक सकाळचा कार्यकारी संपादक बाळ ज. बोठे याला अटक केल्यानंतर पोलिसांनी आता त्याच्याशी संबंधितांची चौकशी सुरू केली आहे. सोमवारी केडगाव येथील राहणारा एका युवक व त्याच्या मित्राची कसून चौकशी पोलिसांनी केली. पोलिसांनी पाच जणांना चौकशीसाठी बोलावले होते. त्यापैकी केवळ दोनचजण आले होते. त्यामुळे त्यांची चौकशी करण्यात आली आहे. आता राहिलेल्या तिघांची चौकशी पोलिसांकडून होणार आहे. 

रेखा जरे हत्याकांडमध्ये मुख्य आरोपी बोठे याला अटक केल्यानंतर पोलिसांनी न्यायालयामध्ये त्याच्या विरोधात दोषारोपपत्र दाखल करण्याची तयारी सुरू केली आहे. मागील आठवड्यामध्ये पाचजणांना चौकशीसाठी बोलवले होते. बोठे कडून जी माहिती मिळाली होती, त्यानुसार आता ही चौकशी सुरू झाली आहे. फरार असतानाच्या काळात बोठेला मदत करणारांचा यात समावेश आहे. यामध्ये पहिल्या टप्प्यात पाच जणांचा समावेश होता. त्यांना पोलिसांनी नोटिसा बजावून जबाबासाठी बोलावले होते. यातील केडगाव येथील एका व्यक्तीचा समावेश आहे. त्याच्या समवेत त्याचा एक मित्र सुद्धा यावेळी उपस्थित होता. या दोघांची चौकशी या प्रकरणाचे तपासी अधिकारी व उपविभागीय अधिकारी अजित पाटील यांच्यासमोर करण्यात आली.

तो होता बोठेच्या संपर्कात

ज्या वेळेला रेखा जरे यांचे हत्याकांड झाले, त्यावेळेला केडगावचा हा युवक बोठेच्या संपर्कात असल्याचे समोर आले आहे. चौकशीमध्ये त्याने काही बाबींची माहिती पोलिसांना दिलेली आहे. मात्र, हा युवक अचानक बोठेच्या संपर्कात कसा आला व कोणामुळे आला, हा खरा महत्त्वाचा भाग असून, त्याच्याशी त्याचे संबंध कशा प्रकारचे होते, बोठे व तो किती वर्षापासून एकमेकांना ओळखतात तसेच त्याच्याकडे आलेली संपत्ती ही नेमकी कुठून, कशाप्रकारे आली हासुद्धा महत्त्वाचा चौकशीत असून, बोठे याने त्यावेळेला त्याच्याशी काय गोष्टी केल्या व त्यांच्यात काय संवाद झाला, या बाबीही चौकशीत पुढे आल्या आहेत, असे सूत्रांकडून समजले.

बोठे याने चौकशीच्या वेळेस जी माहिती दिली आहे, त्याची सत्यता पोलिसांनी पडताळून पाहिली आहे. ज्यांची चौकशी झाली, त्यांचे लेखी जबाब सुद्धा घेतले आहेत. तीन जणांची चौकशी अद्याप बाकी असून, त्यांना एक-दोन दिवसांमध्ये बोलावण्यात आले आहे. त्यांच्याकडूनही त्यांचे बोठेशी कशाप्रकारचे संबंध होते, हे स्पष्ट होणार आहे. दरम्यान, घटना घडल्यापासून बाळ बोठे हा फरार झाला होता. तो नगरमध्ये रेल्वे स्टेशनवर राहिला असल्याची माहिती त्याच्याकडूनच मिळाल्यानंतर पोलिसांनी रेल्वे प्रशासनाकडून त्याची माहिती मागवली आहे. रेल्वे स्टेशनवरील 3 ते 10 डिसेंबरच्या काळातील सीसीटीव्ही फुटेजही मिळवण्याचा प्रयत्न पोलिसांचा सुरू आहे.

COMMENTS