Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

महाराष्ट्रासह देशभरात ईडीने घेतली झाडाझडती

साई रिसॉर्टप्रकरणी रामदास कदम यांचे बंधू ईडीच्या ताब्यात

नवी दिल्ली/मुंबई ः अंमलबजावणी संचालनालय अर्थात ईडीचे छापे अजुनही काही थांबण्याची चिन्हे नसून, शुक्रवारी बिहार, दिल्लीसह महाराष्ट्रात अनेक ठिकाणी

संगणक कर्मचार्‍यांना कनिष्ठ लिपिक पदाची लॉटरी
ज्येष्ठ साहित्यिक  डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांचे निधन
’मनसे’ नेते संदीप देशपांडेंवर जीवघेणा हल्ला

नवी दिल्ली/मुंबई ः अंमलबजावणी संचालनालय अर्थात ईडीचे छापे अजुनही काही थांबण्याची चिन्हे नसून, शुक्रवारी बिहार, दिल्लीसह महाराष्ट्रात अनेक ठिकाणी ईडीने छापे टाकले. ईडीने दिल्ली, बिहार आणि उत्तर प्रदेशातील जवळपास 15 ठिकाणांवर छापे मारले. हे छापे लालूप्रसाद यादव आणि त्यांच्या निकटवर्तीयांच्या ठिकाणी मारले आहेत. याआधी सीबीआयने या प्रकरणात लालूप्रसाद यादव आणि राबडीदेवी यांचीही चौकशी केली होती.
ईडीच्या टीमने लालू यादव यांच्या मुलींच्या दिल्लीतील घरांवरही छापे टाकले. यासोबतच ईडीचे पथक राजदचे माजी आमदार के अबू दोजाना यांच्या पाटणा येथील घरीही पोहोचले असून छापेमारी सुरू आहे. माजी आमदार अबू दोजाना हे बांधकाम व्यावसायिक असून लालूंच्या जवळचे आहेत.जमिनीच्या बदल्यात नोकरीच्या प्रकरणात लालू यादव यांच्या अडचणी वाढत आहेत. दोनच दिवसांपूर्वी सीबीआयच्या पथकाने लालू यादव यांची दिल्लीत चौकशी केली. दुसरीकडे, ईडीने शुक्रवारी दोन राज्यांमध्ये छापे टाकले आहेत. लालू यादव यांच्या तीन मुलींच्या घरांवरही छापे टाकण्यात आल्याची माहिती आहे. हेमा, रागिणी आणि चंदा यांचे घर दिल्लीत असून सध्या घरी ईडीची टीम हजर आहे. सूत्रांवर विश्‍वास ठेवला तर ईडीचे पथक बिहारचे उपमुख्यमंत्री लालू यादव यांचे पुत्र तेजस्वी यादव यांच्या दिल्लीतील निवासस्थानीही झाडाझडती घेतल्याचे दिसून आले.
महाराष्ट्रात देखील ईडीने छापेमारी करत शिवसेना नेते रामदास कदम यांचे बंधू आणि ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांचे निकटवर्तीय सदानंद कदम यांना ईडीने ताब्यात घेतले आहे. दापोली येथील कथित साई रिसॉर्टप्रकरणी ही कारवाई करण्यात आल्याचे कळते. त्यामुळे परबांच्या अडचणी वाढल्या आहेत. मनी लॉड्रिंग आणि दापोली येथील कथित साई रिसॉर्टप्रकरणी अनिल परब यांच्या शासकीय निवासस्थानी यापूर्वीच ईडीने छापेमारी केली होती. त्यांच्याविरोधात मनी लॉड्रिंगचा गुन्हाही दाखल केला होता. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. पर्यावरण मंत्रालय भारत सरकार यांनी 31 जानेवारी 2022 रोजी दापोली रत्नागिरी येथील साई रिसॉर्ट हे अनधिकृत असून तोडण्याचे आदेश दिले होते. 90 दिवसांमध्ये रिसॉर्ट मालक किंवा प्रशासनाने हे दोन्ही रिसॉर्ट तोडायचे होते. मात्र, 90 दिवस पूर्ण झाले असून अजूनही रिसॉर्ट पाडण्यात आले नाही. या रिसॉर्टच्या व्यवहार प्रकरणात मनी लाँड्रिंगचा आरोप करण्यात येत आहे. विशेष म्हणजे साई रिसॉर्ट पाडण्यासाठी राज्याच्या बांधकाम विभागाने स्थानिक वर्तमानपत्रातून जाहिरात दिली होती.

COMMENTS