Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

परम सद्गुरु शुक्राचार्य महाराजांचा जन्मोत्सव जल्लोषात साजरा

कोपरगाव प्रतिनिधी ः कोपरगाव येथील बेट भागातील दैत्यगुरु श्री शुक्राचार्य महाराजांचा जन्मोत्सव गुरुवारी रोजी राष्ट्रसंत जनार्दन स्वामी आश्रमाचे मठ

VIRAL: भाऊ कदम खरंच स्क्रिप्ट कसे पाठ करतात? पहा हा धमाल व्हिडीओ | Lok News24
वंचित बहुजन आघाडी परभणी शेवगाव कार्यालयासमोर आंदोलन | LOKNews24
बौद्ध संस्कार संघाच्या वतीने वर्षावासास शुभारंभ

कोपरगाव प्रतिनिधी ः कोपरगाव येथील बेट भागातील दैत्यगुरु श्री शुक्राचार्य महाराजांचा जन्मोत्सव गुरुवारी रोजी राष्ट्रसंत जनार्दन स्वामी आश्रमाचे मठाधीपती प.पु. रमेशगिरीजी महाराज, विश्‍वात्मक जंगली महाराज आश्रमाचे संत, व प.पु शारदागिरी महाराज, प.पु राघवेश्‍वरनंदगिरीजी महाराज यांच्यासह परिसरातील अनेक साधुसंत व भाविका भक्तांच्या उपस्थितीत मोठ्या जल्लोषात संपन्न झाला.
श्रावण शुद्ध अष्टमी स्वाती नक्षत्राच्या दिवशी म्हणजेच गुरुवार दि. 24 ऑगस्ट रोजी महाराजांच्या जन्मोत्सव दिनी संत महंतांच्या शुभहस्ते महाराजांच्या पालखीचे पूजन करत साधुसंतांच्या समवेत सजवलेल्या ट्रॅक्टरमधून भव्य दिव्य मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर उपस्थित सर्व साधुमंहतांचे स्वागत आ.आशुतोष काळे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांच्या शुभहस्ते महाराजांचा मुखवटा स्थापन करण्यात आला. त्यानंतर परमपूज्य रमेशगिरीजी महाराज व प्रसिद्ध डॉ.विजय क्षीरसागर यांच्या हस्ते गुरु शुक्राचार्य महाराजांचा अभिषेक करत मंत्र उच्चारात शुक्र जन्मसोहळा साजरा करत त्यानंतर देवा ब्राह्मणच्या व हजारो भाविक भक्तांच्या साक्षीने मोठ्या जल्लोषात शिवपार्वती विवाह सोहळा संपन्न झाला. प्रसिद्ध व्यापारी व महाराजांचे निस्सीम भक्त श्री व सौ प्रदीप शेठ राठी या यजमानांच्या सहकार्याने उपस्थित सर्व भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.
याप्रसंगी परमपूज्य रमेशगिरी महाराज, प.पु. राघवेश्‍वरनंदगिरी महाराज, प.पु शारदागिरी महाराज यांच्यासह विश्‍वात्मक जंगली महाराज आश्रमातील व पंच क्रोशितील साधू संत , चेन्नई येथील महाराजांचे निस्सीम भक्त शेखरसह आलेले पुरोहित, कोपरगाव येथील प्रसिद्ध पुरोहित ,आ. आशुतोष काळे, अहमदनगर जिल्हा बँकेचे संचालक विवेक कोल्हे, माजी खा. भाऊसाहेब वाकचौरे, नाशिक पदवीधर मतदारसंघाचे मा. आ.डॉ. सुधीर तांबे, अमृत संजीवनीचे चेअरमन पराग संधान, शिवसेना ठाकरे गटाचे उत्तर नगर जिल्हाध्यक्ष प्रमोद लभडे, कोपरगाव शहराध्यक्ष सनी वाघ आदी प्रमुख मान्यवरासह महाराजांचे हजारो हजारो भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
   हा सोहळा यशस्वी साजरा करण्यासाठी मंदिर ट्रस्ट अध्यक्ष बाळासाहेब आव्हाड, ट्रस्टी हेमंत पटवर्धन, मंदिर प्रमुख सचिन परदेशी, उपमंदिर प्रमुख प्रसाद पर्‍हे, स्थानिक व्यवस्थापन कमिटी सदस्य बाळासाहेब लकारे, राजेंद्र आव्हाड, संजय वडांगळे, बाळासाहेब गाडे, राजेंद्र पंडोरे , दिलीप सांगळे, मधुकर साखरे, विलास आव्हाड , अरुण जोशी, महेंद्र नाईकवाडे, विकास शर्मा, सुजित वरखेडे, विजय रोहोम्, भागचंद रुईकर , दत्तात्रय सावंत, मुरलीधर मंदिर महिला भजनी मंडळ , बेट भागातील सर्व तरुण मंडळे , संपूर्ण पालखी रस्त्यावर रांगोळी काढणारे बेट भागातील ग्रामस्थ व भाविकांनी अथक परिश्रम घेत कोपरगावला अती भव्य-दिव्य सोहळा मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला.

COMMENTS