Homeताज्या बातम्या

नाट्यशास्त्र प्रमाणपत्र व पदविका अभ्यासक्रमासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू; बीडमधील केशरबाई क्षीरसागर महाविद्यालयाचा उपक्रम

बीड: सौ. केशरबाई सोनाजीराव क्षीरसागर ऊर्फ काकू कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, बीड येथील नाट्यशास्त्र विभागात डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा

मरखेल पोलिसांची मोठी कामगिरी; १ लाख ५७ हजारांचे ७ चोरीचे मोबाईल हस्तगत करून मालकांना केले परत
कोपरगाव येथे पाच दिवसीय योग उत्सव उत्साहात; नियमित योगाभ्यास करण्याचे विद्यार्थ्यांन आवाहन
सज्जन-दुर्जन असा भेद न करता माऊलींनी सर्वांवर कृपा केली; ह.भ.प. श्री राम महाराज काजळे यांचे प्रतिपादन

बीड: सौ. केशरबाई सोनाजीराव क्षीरसागर ऊर्फ काकू कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, बीड येथील नाट्यशास्त्र विभागात डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाशी संलग्न नाट्यशास्त्र पदविका व प्रमाणपत्र अभ्यासक्रमासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे.

या अभ्यासक्रमासाठी १२ वी उत्तीर्ण असणे आवश्यक असून वयाची कोणतीही अट ठेवण्यात आलेली नाही. त्यामुळे शिक्षण, व्यवसाय किंवा नोकरी करणारे तसेच नाट्यक्षेत्राची विशेष आवड असणारे विद्यार्थी, हौशी कलाकार आणि रसिक या अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊ शकतात. या अभ्यासक्रमात नाट्य इतिहास, अभिनय, रंगमंच, दिग्दर्शन, नाट्यव्यवस्थापन, नाट्यलेखन, नाट्यसमीक्षा आदी विविध विषयांचे शास्त्रशुद्ध आणि व्यावहारिक प्रशिक्षण दिले जाणार आहे.

इच्छुक विद्यार्थी व कलाकारांनी या सुवर्णसंधीचा लाभ घेऊन प्रवेशासाठी संपर्क साधावा, असे आवाहन महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. शिवानंद क्षीरसागर व उपप्राचार्य डॉ. अनिता शिंदे यांनी केले आहे. अभ्यासक्रमाच्या अधिक माहितीसाठी नाट्यशास्त्र विभाग प्रमुख डॉ. संजय पाटील देवळाणकर व डॉ. दुष्यंता रामटेके यांच्याशी थेट संपर्क साधण्याचे आवाहनही प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

COMMENTS