Homeताज्या बातम्यादेश

ईडीची बंगाल, तामिळनाडूमध्ये छापेमारी

मुख्यमंत्री ममता बॅनर्जींच्या मंत्र्यांवर कारवाई

नवी दिल्ली/प्रतिनिधी ः केंद्रीय तपास यंत्रणा अर्थात अंमलबजावणी संचालनालय अर्थात ईडीने गुरूवारी पश्‍चिम बंगला, तामिळनाडू आणि तेलंगणामध्ये छापेमारी

ईडीची राज्यभरात छापेमारी
उद्धव ठाकरेंच्या निकटवर्तींयांवर ‘ईडी’चे छापे
राजस्थानमध्ये ईडीच्या अधिकार्‍याच्या घरीच छापे

नवी दिल्ली/प्रतिनिधी ः केंद्रीय तपास यंत्रणा अर्थात अंमलबजावणी संचालनालय अर्थात ईडीने गुरूवारी पश्‍चिम बंगला, तामिळनाडू आणि तेलंगणामध्ये छापेमारी केल्यामुळे खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे ईडीच्या या छाप्यात पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या मंत्रिमंडळातील अनेक नेेते रडारवर असल्याचे दिसून येत आहे.
ममता बॅनर्जी यांच्या सरकारमधील मंत्री रथिन घोष यांच्या निवासस्थानावर आणि कोलकाता आणि उत्तर 24 परगणा जिल्ह्यातील त्यांच्याशी संबंधित 12 ठिकाणांवर छापे टाकले आहेत. त्याच वेळी ईडी उत्तर 24 परगणा जिल्ह्यातील टीटागड नगरपालिकेचे माजी अध्यक्ष प्रशांत चौधरी यांच्या निवासस्थानाची चौकशी करत आहे. टीटागड नगरपालिकेतील नोकरभरती घोटाळ्याप्रकरणी प्रशांत चौधरी यांच्यावर ही कारवाई करण्यात येत आहे. तामिळनाडू आणि तेलंगणामध्ये आयकर छापेमारी झाली आहे. चेन्नई, तामिळनाडू येथील द्रमुक खासदार एस जगतरक्षकांच्या 40 हून अधिक परिसरांची झडती सुरू आहे. हैद्राबाद, तेलंगणात इन्कम टॅक्सने सत्ताधारी पक्षाचे बीआरएस आमदार मगंती गोपीनाथ यांच्यावर कारवाई केली आहे. आयकर अधिकार्‍यांचे पथक हैदराबादमधील ज्युबली हिल्स, कुकटपल्ली, गचिबोवलीसह बीआरएस आमदारांच्या निवासस्थानी आणि कार्यालयाची झडती घेत आहे.

COMMENTS