Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

रंगनाथ महाराज संस्थान, मादळमोही येथे धर्मनाथ बीज उत्सव उत्साहात साजरा

बीड । प्रतिनिधीगेवराई तालुक्यातील मादळमोही येथे नाथ संप्रदायातील रंगनाथ महाराजांची संजीवन समाधी आहे. रंगनाथ महाराज संस्थानच्या मठाधिपती हभप कृष्णा

शेतकऱ्यांच्या प्रश्नावर शेकापचे अर्धनग्न आंदोलन
Beed : वीरशैव समाजाचा आधारवड कोसळला
सिरसाळ्यात महावितरणचा भोंगाळ कारभार! वसुली जोरात, लाईट कोमात; नागरिक आक्रमकदररोज 33 केव्हीचा बिघाड; हे गणित काय?वीज नसतानाही अव्वाच्या सव्वा बिल आणि वसुलीसाठी होणारा तगादा.विजेअभावी पिठाच्या गिरण्या, वेल्डिंग दुकाने आणि इतर लघुउद्योग संकटात.वारंवार वीज खंडित होत असल्याने विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर परिणाम.

बीड । प्रतिनिधी
गेवराई तालुक्यातील मादळमोही येथे नाथ संप्रदायातील रंगनाथ महाराजांची संजीवन समाधी आहे. रंगनाथ महाराज संस्थानच्या मठाधिपती हभप कृष्णा महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली धर्मनाथ बीज सोहळा दि. 20 जानेवारी 2026, मंगळवार रोजी उत्साहात आयोजित करण्यात आला.
संस्थानाच्या संजीवन समाधीला अभिषेक करून मंदिर परिसरात फुलांनी आकर्षक सजावट करण्यात आली होती. सकाळी 9 वा. धर्मनाथ महाराजांच्या कथेला सुरुवात झाली, यावेळी भाविकांनी कथा श्रवणाचा लाभ घेतला. याशिवाय 7 कुंडी गायत्री महायज्ञ सोहळा गायत्री मातेला नमन करून सुरू झाला. दुपारी बारा वाजता नाथांची आरती केली गेली आणि भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. प्रमुख उपस्थितीत माजी राज्यमंत्री बदामराव आबा पंडित, जिल्हा परिषद सदस्य बप्पासाहेब अण्णा तळेकर, तसेच सामाजिक व धार्मिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजक गायत्री परिवारातील सदस्य आणि भाविकांची मोठ्या संख्येने मंदिर परिसरात उपस्थिती होती.

COMMENTS