Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मराठा उपसमिती बरखास्त करा : मनोज जरांगे

बीड :  मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे यांनी राज्य सरकारविरोधात पुन्हा आक्रमक भूमिका घेत ३० मेपासून अंतरवाली सराटी येथे आमर

वडलोपार्जित रस्ता आडविल्याने शेत जमीन पडीक ठेवण्याची वेळ
शेतकऱ्यांचा एल्गार! शेत रस्ता आणि ओढ्याचे अतिक्रमण हटवण्यासाठी ग्रामपंचायत सदस्याचे आमरण उपोषण!
केज पंचायत समिती परिसरातील बॅनर अतिक्रमण हटवण्याची; मागणी; 8 दिवसांचा अल्टिमेटम, अन्यथा आमरण उपोषणाचा इशारा

बीड :  मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे यांनी राज्य सरकारविरोधात पुन्हा आक्रमक भूमिका घेत ३० मेपासून अंतरवाली सराटी येथे आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. मराठा आरक्षणासाठी स्थापन करण्यात आलेली उपसमिती तात्काळ बरखास्त करावी, अशी मागणीही त्यांनी केली. भाजप नेते प्रसाद लाड यांनी शुक्रवारी अंतरवाली सराटी येथे जाऊन मनोज जरांगे यांची भेट घेतली. उपोषण करू नये, असे आवाहन त्यांनी यापूर्वी केले होते. त्यानंतर जरांगे यांनी त्यांना प्रत्यक्ष चर्चेसाठी अंतरवाली येथे येण्याचे निमंत्रण दिले होते. यावेळी बोलताना मनोज जरांगे यांनी, “५८ लाख नोंदींचे काय झाले, हे सरकारने स्पष्ट करावे. नोंदी सापडल्यानंतरही प्रमाणपत्रे का दिली नाहीत,” असा सवाल उपस्थित केला. मनोज जरांगे यांनी राज्य सरकारला २९ मे २०२६ पर्यंतची अंतिम मुदत दिली असून, मराठवाड्यातील सर्व मराठा समाजाला त्या कालावधीत कुणबी प्रमाणपत्रे देण्यात यावीत, अशी प्रमुख मागणी केली आहे. मुंबई आंदोलनावेळी सरकारने दिलेली आश्वासने आठ महिने उलटूनही पूर्ण झालेली नाहीत. मुख्यमंत्री एकनाथ  शिंदे  आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र  फडणवीस  यांनी मराठा समाजाची दिशाभूल केल्याचा आरोपही त्यांनी केला. मनोज जरांगे यांच्या –  मराठवाड्यातील सर्व मराठा समाजाला २९ मेपूर्वी कुणबी प्रमाणपत्र द्यावे, सातारा, कोल्हापूर, औंध, पुणे व मिरज संस्थानांबाबत १९९४ प्रमाणे शासन निर्णय काढावा, आंदोलनातील सर्व गुन्हे मागे घ्यावेत, सारथीच्या सर्व योजना पुन्हा सुरू कराव्यात, मराठा उपसमिती बरखास्त करावी, स्वतंत्र कुणबी व मराठा मंत्रालय स्थापन करावे आदी प्रमुख मागण्या आहेत.

COMMENTS