मुंबई : नाशिक येथील तथाकथित कॅप्टन अशोक खरात लैगिंक अत्याचारप्रकरणी अटकेत असतांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळातील अन्न आणि औषध

मुंबई : नाशिक येथील तथाकथित कॅप्टन अशोक खरात लैगिंक अत्याचारप्रकरणी अटकेत असतांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळातील अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांचा शासकीय निवासस्थानी आक्षेपार्ह आणि अश्लील अवस्थेतील व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर खळबळ उडाली असून, याप्रकरणी विरोधकांनी मंत्री झिरवाळांचा राजीनामा घेण्याची मागणी केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हा व्हिडिओ मंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानाशी संबंधित असल्याचा दावा केला जात आहे. व्हिडिओमध्ये एका तृतीयपंथी व्यक्तीसोबत एक व्यक्ती दिसत असून ती व्यक्ती मंत्री झिरवाळ यांच्यासारखी असल्याचे सांगितले जात आहे. या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षांनी या घटनेची गंभीर दखल घेत मंत्रीपदावरून त्यांना तात्काळ दूर करण्याची मागणी केली आहे. राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाची सांगता होत झाल्यानंतर अवघ्या काही तासांमध्येच हा प्रकार उघडकीस आल्याने राजकीय वातावरण अधिक तापले आहे. संबंधित व्हिडिओ काही महिन्यांपूर्वीचा असल्याची चर्चा असून तो अचानक समोर आल्यामुळे त्यामागील हेतू आणि वेळ याबाबतही विविध तर्क वितर्क लावले जात आहेत. व्हिडिओमध्ये दिसणार्या तृतीयपंथी व्यक्तीविरुद्ध यापूर्वी मुंबईतील कुरार पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल असल्याची माहिती समोर येत आहे. नरहरी झिरवाळ हे नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी या आदिवासी बहुल मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. काही महिन्यांपूर्वी त्यांच्या कार्यालयातील एका कर्मचार्याला लाच स्वीकारताना पकडण्यात आले होते. त्या घटनेनंतरही त्यांच्या राजीनाम्याची मागणी झाली होती. आता नव्या वादामुळे त्यांच्या अडचणी वाढण्याची चिन्हे दिसत आहेत. दरम्यान, या प्रकरणाची कल्पना मंत्री झिरवाळ यांना आधीपासूनच असल्याची चर्चा आहे. त्यांनी मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन यासंदर्भात चर्चा केल्याचेही सूत्रांकडून सांगितले जात आहे. त्यामुळे हा प्रकार केवळ वैयक्तिक वाद आहे की त्यामागे राजकीय घडामोडी आहेत, याबाबतही प्रश्न उपस्थित होत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अलीकडच्या काळात सुरू असलेल्या अंतर्गत हालचालींच्या पार्श्वभूमीवर या घटनेकडे अधिक गांभीर्याने पाहिले जात आहे. नेतृत्वातील बदल, गटबाजी आणि मंत्रीपदासाठीची स्पर्धा यामुळे काही नेत्यांना लक्ष्य केले जात असल्याचीही चर्चा रंगू लागली आहे. झिरवाळ यांनी यापूर्वी पक्षातील नेतृत्वाबाबत स्पष्ट भूमिका मांडली होती, त्यामुळे त्यांच्या विरोधात राजकीय डावपेच रचले जात असल्याची शक्यता नाकारता येत नाही. या संपूर्ण प्रकरणामुळे सरकारची प्रतिमा, मंत्र्यांची जबाबदारी आणि सार्वजनिक जीवनातील नैतिकता या मुद्द्यांवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

महाराष्ट्राच्या राजकारणातील नैतिक अंधःपतन : सपकाळ
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी या प्रकरणावर तीव्र संताप व्यक्त करत महाराष्ट्राच्या राजकारणातील नैतिक अध:पतनाचे ज्वलंत उदाहरण आहे. अशा कलंकित मंत्र्याला पदावर राहण्याचा कोणताही अधिकार नाही. मुख्यमंत्र्यांनी तातडीने त्यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी सपकाळ यांनी केली आहे. दोन महिन्यांपूर्वीच झिरवाळ यांच्या कार्यालयातील लिपिकाला 35 हजारांची लाच घेताना पकडण्यात आले होते, तेव्हापासूनच ते विरोधकांच्या निशाण्यावर होते.

COMMENTS