हाच नियम लोकप्रतिनिधींनाही लावा – नगराध्यक्ष वहाडणे

Homeमहाराष्ट्रअहमदनगर

हाच नियम लोकप्रतिनिधींनाही लावा – नगराध्यक्ष वहाडणे

जिल्हा परिषद कर्मचारी स्वतःच्या आई वडिलांचा सांभाळ करणार नाहीत,अशांच्या वेतनातून ३०% रक्कम कपात करून ती संबंधितांच्या आईवडिलांच्या खात्यावर जमा करावी असा ठराव नुकताच  अहमदनगर जिल्हा

‘वंचित’च्या वतीने आयोजित सोलो डान्स स्पर्धा उत्साहात
शर्मिला गोसावी यांना रमाई गौरव पुरस्कार जाहीर
लिंबू-पाणी विक्रेत्याला दीड कोटीचं वीजबील! l DAINIK LOKMNTHAN

कोपरगाव शहर प्रतिनिधी : जिल्हा परिषद कर्मचारी स्वतःच्या आई वडिलांचा सांभाळ करणार नाहीत,अशांच्या वेतनातून ३०% रक्कम कपात करून ती संबंधितांच्या आईवडिलांच्या खात्यावर जमा करावी असा ठराव नुकताच  अहमदनगर जिल्हा परिषदेच्या सभेत करण्यात आला असून हा निर्णय नक्कीच स्तुत्य आहे,पण हाच नियम सर्वच शासकिय निमशासकीय कर्मचाऱ्यांन साठी केला तर नक्कीच एक अभिमानस्पद ठरू शकतो असे उदगार कोपरगाव नगरपालिकेचे नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी व्यक्त केले.
       या वेळी वहाडणे यांनी सांगितले की, राज्यभरातील सर्वच  ग्रामपंचायत सदस्य ते संसदेपर्यंतच्या सर्वच निर्वाचित लोक प्रतिनिधींनाही हाच नियम लावून त्यांच्याही वेतन व भत्यामधून काही रक्कम त्यांच्या जन्मदात्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात यावी जर त्या लोकप्रतिनिधीने असे नाही केले तर आणि तो त्यात  दोषी आढळून आल्यास संबंधित  लोकप्रतिनिधींची निवडही रद्द करण्याचा कायदा करायला हवा तरच हा समान नागरी कायदा होऊ शकतो. असे झाले तरच प्रत्येक जण आपल्या आई वडिलांचा सांभाळ करू शकतो असे मत वहाडणे यांनी व्यक्त केले आहे.

COMMENTS