Homeताज्या बातम्यादेश

बाबा राम रहीमची निर्दोष सुटका

उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

नवी दिल्ली : हरियाणातील डेरा सच्चा सौदा प्रमुख बाबा गुरमीत राम रहीमला पंजाब हरियाणा उच्च न्यायालयाने दिलासा देत त्यांची सुटका करण्याचा निर्णय मंग

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर आत्मदहनाचा इशारा | LOKNews24
उद्धव ठाकरेंनी दिला मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा , भाजपला आनंद गगनात मावेना! | LokNews24
बीडमध्ये ‘स्वयंपाकघरातील औषधी वनस्पती’ प्रदर्शनाचे आयोजननागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे-डॉ.विवेक कुलकर्णी

नवी दिल्ली : हरियाणातील डेरा सच्चा सौदा प्रमुख बाबा गुरमीत राम रहीमला पंजाब हरियाणा उच्च न्यायालयाने दिलासा देत त्यांची सुटका करण्याचा निर्णय मंगळवारी दिला आहे. डेरा सच्चा सौदाचे माजी व्यवस्थापक रणजीत सिंग यांच्या हत्येप्रकरणी उच्च न्यायालयाने डेरा मुखीसह 5 जणांची निर्दोष मुक्तता केली आहे. उच्च न्यायालयाने सीबीआय न्यायालयाचा निर्णय रद्द केला आहे. रणजित सिंग यांची 10 जुलै 2002 रोजी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. याप्रकरणात सीबीआय कोर्टाने राम रहीमला दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती.
राम रहीमने जन्मठेपेच्या शिक्षेविरोधात उच्च न्यायालयात अपील दाखल केले होते. मंगळवारी त्यांच्या अपिलावर निर्णय देताना उच्च न्यायालयाने सीबीआय न्यायालयाचा निर्णय रद्द केला आहे. राम रहीम याच्यासह इतर 5 जणांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. याप्रकरणी सविस्तर आदेश येणे बाकी आहे. राम रहीम सध्या तुरुंगात असून पत्रकार हत्या आणि साध्वी बलात्कार प्रकरणात कोर्टाने त्याला दोषी ठरवले आहे. याशिवाय राम रहीमवर सिरसा कॅम्पचे व्यवस्थापक रणजित सिंग यांची हत्या केल्याचा आरोप आहे. याच आरोपाखाली सीबीआयने राम रहीम याच्याविरोधात खटला दाखल केला होता. सुरुवातीला या प्रकरणात राम रहीमचे नाव नव्हते. मात्र, पोलिस तपासावर असमाधानी असणार्‍या रणजित सिंग यांचा मुलगा जगसीर सिंग याने जानेवारी 2003 मध्ये उच्च न्यायालयात याचिका दाखल करून सीबीआय तपासाची मागणी केली होती. त्यानंतर हे प्रकरण सीबीआयकडे सोपवण्यात आले. ऑक्टोबर 2021 मध्ये डेरा मुखीसह पाच आरोपींना दोषी ठरवण्यात आले. कोर्टाने राम रहीमला जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. याशिवाय साध्वी लैंगिक शोषण प्रकरणातही राम रहीम सिंगला 20 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली. सीबीआय कोर्टाच्या या निर्णयाविरोधात राम रहीमने उच्च न्यायालयात अपील दाखल केले होते. मंगळवारी न्यायालयाने राम रहीमच्या अपिलावर अंतिम सुनावणी घेतली. सबळ पुरावे नसल्याने उच्च न्यायालयाने सीबीआय न्यायालयाचा निर्णय रद्द केला आहे. सध्या राम रहीम रोहतकच्या सुनारिया तुरुंगात आहे. अनेक वेळा तो जामीनावर बाहेरही आला होता. यावरून सरकारवर बरीच टीका झाली होती.

COMMENTS