Homeताज्या बातम्या

काँगे्रसमध्ये विलीनीकरणाची कोणतीही चर्चा नाहीखा. सुप्रिया सुळे ; खासदारांमध्ये कोणतीही अस्वस्थता नाही

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या काँग्रेसमध्ये विलीनीकरणाच्या चर्चांना खासदार सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट शब्दांत फेटाळून ला

‘दाना’ चक्रीवादळ ओडिशाच्या किनारपट्टीवर धडकले
जुन्या उपकेंद्राचे आणि वाहिन्यांचे सर्वेक्षण करून कामे सुरू करा : जलसंपदा मंत्री विखे पाटील
मिंधे गटातील लोक भाजप ने लिहुन दिलेली स्क्रिप्ट वाचुन बोलतात – संजय राऊत 
पवारांची राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विलीन होणार का? अखेर सत्य समोर, सुप्रिया सुळेंनी सांगून टाकलं, म्हणाल्या, पवार साहेबांनी... - Marathi News ...


मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या काँग्रेसमध्ये विलीनीकरणाच्या चर्चांना खासदार सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट शब्दांत फेटाळून लावले आहे. पक्षातील सर्व आठही खासदार एक कुटुंबाप्रमाणे एकत्र काम करत असून कोणताही खासदार नाराज नसल्याचा दावा त्यांनी केला. पक्षात मतभेद असल्याच्या चर्चांनाही त्यांनी कोणताही आधार नसल्याचे सांगितले.
अलीकडे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पक्षातील काही खासदार अस्वस्थ असल्याचा दावा केला होता. त्यावर प्रतिक्रिया देताना सुळे म्हणाल्या की, त्यांची आणि पृथ्वीराज चव्हाण यांची याबाबत कोणतीही भेट झालेली नाही. पक्षातील कोणत्याही खासदाराने त्यांची भेट घेतल्याची माहितीही आपल्याकडे नाही. मात्र, ते राज्यातील ज्येष्ठ नेते असल्याने त्यांच्या कानावर काही माहिती आली असेल, तर त्याबाबत त्यांच्याकडून माहिती घेणे ही आपली नैतिक जबाबदारी असल्याचे त्यांनी नमूद केले. सुळे म्हणाल्या की, पक्षातील सर्व खासदार एकदिलाने काम करत असून कोणत्याही प्रकारचा अंतर्गत संघर्ष नाही. पक्षातील एखाद्या व्यक्तीला काही मतभेद असले, तरी ते माध्यमांसमोर व्यक्त करण्याची आमच्या पक्षाची परंपरा नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्या संभाव्य विलीनीकरणाच्या चर्चांवरही सुळे यांनी स्पष्ट भूमिका मांडली. अशा कोणत्याही प्रकारची चर्चा सुरू नसल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले. माध्यमांमध्ये आणि राजकीय वर्तुळात सातत्याने अशा चर्चा होत असल्या, तरी त्या वास्तवाशी संबंधित नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्या म्हणाल्या की, गेल्या अनेक वर्षांपासून आपल्या नावाभोवती विविध प्रकारच्या राजकीय चर्चा रंगवल्या जात आहेत. प्रत्यक्षात मात्र त्यामागे कोणताही तथ्याधार नसतो. शरद पवार यांच्याशीही काँग्रेसमध्ये विलीनीकरणाबाबत कोणतीही चर्चा झालेली नसल्याचे त्यांनी सांगितले.
शरद पवार-एकनाथ शिंदे भेटीबाबतही स्पष्टीकरण
शरद पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात गुप्त बैठक झाल्याच्या चर्चांनाही सुप्रिया सुळे यांनी पूर्णविराम दिला. त्यांनी सांगितले की, विधानभवनात काही आमदारांशी चर्चा करण्यासाठी शरद पवार गेले होते. त्यावेळी जवळ असल्यामुळे ते एकनाथ शिंदे यांच्या दालनात गेले. योगायोगाने ते दालन शिंदे यांचेच होते. त्या वेळी मंत्रिमंडळाची बैठक सुरू होती. काही क्षणांसाठी एकनाथ शिंदे खाली आले आणि शरद पवार यांच्याशी औपचारिक चर्चा करून पुन्हा बैठकीसाठी निघून गेले. या घटनेचा राजकीय अर्थ लावणे योग्य नसल्याचे सुळे म्हणाल्या.

COMMENTS