Homeताज्या बातम्या

आ. अमरनाथ राजूरकर यांच्या विजयाचा भोकरमध्ये जल्लोषसलग तिसर्‍यांदा विधानपरिषदेत विजयी; भाजप कार्यकर्त्यांकडून फटाक्यांची आतषबाजी व पेढे वाटप

नांदेड स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून भारतीय जनता पक्ष व महायुतीचे उमेदवार आमदार अमरनाथ राजूरकर यांनी सलग तिसर्‍यांदा दणदणीत विजय मिळवल्यान

संत गोरोबा काकांच्या ७५९ व्या जयंतीनिमित्त नांदेडमध्ये भव्य शोभायात्रा; गुणवंतांचा होणार गौरव
जागतिक योग दिनानिमित्त भाजपा नांदेड महानगरचे भव्य योग शिबिर; 500 हून अधिक योगसाधकांचा  सहभाग
विरोधकांच्या गोटात खिंडार, अमरनाथ राजुरकरांची विजयी हॅट्रिक; सूक्ष्म रणनीतीने महायुतीने राखले वर्चस्व



नांदेड स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून भारतीय जनता पक्ष व महायुतीचे उमेदवार आमदार अमरनाथ राजूरकर यांनी सलग तिसर्‍यांदा दणदणीत विजय मिळवल्याने भोकर शहरात भाजप कार्यकर्त्यांनी उत्साहात जल्लोष साजरा केला.
स्थानिक स्वराज्य संस्था विधानपरिषद निवडणुकीत आ. अमरनाथ राजूरकर यांनी प्रचंड मताधिक्याने विजय संपादन केल्यानंतर सोमवारी भोकर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात भाजप कार्यकर्त्यांनी एकत्र येत फटाक्यांची आतषबाजी केली तसेच नागरिकांना पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला. यावेळी भारतीय जनता पार्टीचा विजय असो, अशोकराव चव्हाण यांचा विजय असो, आ. श्रीजया चव्हाण यांचा विजय असो तसेच आ. अमरनाथ राजूरकर आगे बढो, हम तुम्हारे साथ हैं अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला. कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. या आनंदोत्सवात नगराध्यक्ष भगवानराव दंडवे, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष किशोर पाटील लगळूदकर, उपनगराध्यक्ष दिलीप सोनवाडे, शहराध्यक्ष विशाल माने, गटनेते विठ्ठल पाटील धोंडगे, डॉ. मनोज गिमेकर, योगेश देशपांडे, शेख नाजीम, सुहास पवार, गौतम कसबे, सिद्धेश्वर पिटलेवाड, डॉ. राम नाईक, सुवेश पोकलवार, बालाजी घिसेवाड, योगेश इज्जतगांवकर, शैलेश सूर्यवंशी यांच्यासह नगरसेवक, पदाधिकारी आणि भाजप कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आ. अमरनाथ राजूरकर यांच्या विजयामुळे नांदेड जिल्ह्यात भाजप व महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून, भोकरमधील हा जल्लोष त्याचेच प्रतीक मानला जात आहे.

COMMENTS