पुणे: पुणे ग्रामीण पोलीस दलातील दोन कर्मचाऱ्यांचा सुमारे एक कोटी रुपयांच्या दरोड्याच्या कटात थेट सहभाग उघडकीस आल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे. नऱ्ह
पुणे: पुणे ग्रामीण पोलीस दलातील दोन कर्मचाऱ्यांचा सुमारे एक कोटी रुपयांच्या दरोड्याच्या कटात थेट सहभाग उघडकीस आल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे. नऱ्हे पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नवले परिसरात १८ जुलै रोजी हर्षवर्धन पवार या व्यापाऱ्यावर दरोडा टाकण्याचा प्रयत्न झाला होता.
या गंभीर प्रकरणात पोलीस हवालदार प्रमिला निकम आणि पोलीस नाईक अजित मेस्त्री या दोघांचा या दरोड्याच्या कटात थेट सहभाग असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. रक्षणकर्त्यांनीच भक्षक बनत खाकी वर्दीची प्रतिमा मलीन केल्याने, पुणे ग्रामीण पोलिसांनी या दोन्ही कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करत त्यांचे तातडीने निलंबन केले आहे.

COMMENTS