Homeताज्या बातम्यादेश

देशात 24 तासामध्ये 10 हजार 15 नवे रूग्ण

महाराष्ट्रात 1 हजार 115 रुग्णांची नोंद ः 9 जणांचा मृत्यू

नवी दिल्ली/मुंबई : देशात कोरोना रुग्णांच्या संख्येचा वेग वाढत असून, 24 तासामध्ये तब्बल 10 हजारापेक्षा अधिक रूग्ण आढळून आल्यामुळे खळबळ उडाली आहे.

प्रत्येक कार्यकर्त्यांनी स्वतः उमेदवार म्हणून जबाबदारी पार पाडा ः आ. मोनिका राजळे
रेल्वेच्या फुकट्या प्रवाशांकडून 303 कोटींचा दंड वसूल
कर्जत नगरपंचायतीने शहर विकास आराखडा न बनवताच खर्च केले कोट्यावधी

नवी दिल्ली/मुंबई : देशात कोरोना रुग्णांच्या संख्येचा वेग वाढत असून, 24 तासामध्ये तब्बल 10 हजारापेक्षा अधिक रूग्ण आढळून आल्यामुळे खळबळ उडाली आहे. तर महाराष्ट्रात देखील 24 तासामध्ये 1 हजार 115 रुग्ण आढळून आले असून, 9 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
तब्बल 7 महिने 20 दिवसांनंतर देशात कोरोनाच्या नवीन रुग्णांची संख्या 10 हजारांच्या पुढे गेली आहे. यापूर्वी 24 ऑगस्ट 2022 रोजी 10 हजार 725 रुग्ण आढळली होती. नव्या रुग्णसंख्येसह, देशातील सक्रिय रुग्णांची संख्या 44 हजार 998 वर गेली आहे.  महाराष्ट्रात देखील रुग्णांची संख्या वाढत असून, काल 560 रुग्ण बरे झाले आहेत. मार्च 2020 पासून आतापर्यंत 81 लाख 52 हजार 291 रुग्णांची तर 1 लाख 48 हजार 470 मृत्यूंची नोंद झाली आहे. 79 लाख 98 हजार 400 रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात कोरोनाचे 5421 सक्रिय रुग्ण असून त्यामधील मुंबईत 1577, ठाणे 953, पुणे 776, नागपूर 548, रायगड 237, पालघर 160, सांगली 167, सोलापूर 125, सातारा 123, उस्मानाबाद 124 सक्रिय रुग्णांची नोंद झाली आहे. राज्यात आतापर्यंत कोरोनामुळे एक ते तीन मृत्यूंची नोंद होत होती. बुधवारी त्यात वाढ होऊन 9 मृत्यूची नोंद झाली आहे. मुंबई 2, ठाणे पालिका 2, वसई विरार पालिका 1, पुणे पालिका 3 तसेच अकोला येथे 1 असे आज मृत्यू नोंद झाले आहेत. आतापर्यंत एकूण 1 लाख 48 हजार 470 मृत्यूची नोंद झाली आहे. राज्यातील रुग्णसंख्या एक हजारच्या पार गेली आहे. तसेच मृत्यूची संख्या वाढल्याने नागरिकांची आणि आरोग्य विभागाची डोकेदुखी वाढली आहे.

COMMENTS