Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

आदरणीय पी. डी. पाटील गौरव प्रतिष्ठानचा ’कराड गौरव पुरस्कार सौ. पुष्पा कुलकर्णी यांना जाहीर

कराड / प्रतिनिधी : येथील आदरणीय पी. डी. पाटील गौरव प्रतिष्ठानचा सन 2024 चा ’कराड गौरव पुरस्कार’ शालेय, चित्रकला, स्काऊट गाईड संघटना, विकलांग वि

सातारा जिल्ह्यातील 1 हजार 323 स्वस्त धान्य दुकानांना आयएसओ मानांकन
करहर-महू रस्त्यावर साईड पट्ट्या भरण्याचे काम जोमात
शासकीय वसतिगृहात बाल लैंगिक अत्याचाराबाबत समुपदेशन कार्यक्रम

कराड / प्रतिनिधी : येथील आदरणीय पी. डी. पाटील गौरव प्रतिष्ठानचा सन 2024 चा ’कराड गौरव पुरस्कार’ शालेय, चित्रकला, स्काऊट गाईड संघटना, विकलांग विद्यार्थ्यांसाठी तसेच नाट्यक्षेत्र, आकाशवाणी व दूरदर्शनच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्य व राज्याच्या बाहेर दिल्लीपर्यंत, आपल्या शैक्षणिक व सामाजिक कार्याचा ठसा उमटवीत या क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य केलेल्या, सेवानिवृत्त शिक्षिका सौ. पुष्पा दिलीप कुलकर्णी यांना जाहीर झाला आहे.
पुरस्काराची घोषणा प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष, राज्याचे माजी सहकार व पालकमंत्री आ. बाळासाहेब पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या विश्‍वस्तांच्या सभेमध्ये करण्यात आल्याची माहिती पत्रकाद्वारे देण्यात आली आहे. यावेळी प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष डॉ. अशोकराव गुजर, अ‍ॅड. मानसिंगराव पाटील, राजेंद्र वसंतराव माने, दिलीप चव्हाण, डॉ. विजयकुमार साळुंखे, सौ. रेश्मा कोरे, सौ. शोभा पाटील, संयोजन समिती सदस्य प्रा. रामभाऊ कणसे, ए. एन. मुल्ला, मुकुंदराव कुलकर्णी, संभाजी पाटील, प्रकाश पवार, अबूबकर सुतार व सुहेल बारस्कर यांची उपस्थिती होती.
प्रतिष्ठानच्या स्थापनेपासून विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य केलेल्या जवळपास 80 मान्यवरांचा ’कराड गौरव’ पुरस्काराने सन्मान करण्यात आला आहे. सन 2024 चा पुरस्कार सौ. पुष्पा कुलकर्णी यांना फेब्रुवारी महिन्यात समारंभपूर्वक प्रदान करण्यात येणार आहे, असेही आ. पाटील यांनी स्पष्ट केले.

COMMENTS