Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

… तर वडूज नगरपंचायतीमध्ये वंचित बहुजन आघाडी राष्ट्रवादीबरोबर

वडूज : प्रभाकर देशमुख यांना निवेदन देताना मान्यवर. (छाया : अहमद मुल्ला ) म्हसवड / वार्ताहर : वडूज नगरपंचायत निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या श्

कायद्याची भीती मनातून काढून टाका : जिल्हा न्यायाधीश अनिरुध्द गांधी
श्री अंबाबाई मंदिरात चोरी करताना दोन महिलांना रंगेहात पकडले
कराडला रिक्षा व्यावसायिकांचे आरटीओ कार्यालयासमोर धरणे आंदोलन

म्हसवड / वार्ताहर : वडूज नगरपंचायत निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या श्रीमती शोभाताई बडेकर यांचा विजय झाल्याने वंचितने पश्‍चिम महाराष्ट्रामध्ये खाते उघडल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह संचारला आहे.
वडूज नगरपंचायतीमध्ये कोणत्याही पक्षाला बहुमत न मिळाल्यामुळे नगरपंचायतीमध्ये निवडून आलेल्या प्रत्येक नगरसेवकांचे महत्त्व वाढले आहे. त्याच अनुषंगाने वंचित बहुजन आघाडीने वडूज नगरपंचायत सभागृहामध्ये राष्ट्रवादीकडून प्रेरित होणार्‍या बहुमत ठरावास काही अटीवर पाठिंबा देण्यासाठी राष्ट्रवादीचे नेते प्रभाकर देशमुख यांना पश्‍चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष शाकीरभाई तांबोळी यांच्या मार्गदर्शनाखाली वंचित बहुजन आघाडीचे वडूज नगरपंचायतीसाठीचे निरीक्षक उत्तम वनशिव यांच्या हस्ते निवेदन देण्यात आले. त्यांच्याबरोबर वंचितचे सातारा जिल्हा संघटक इम्तियाज नदाफ, माण तालुका अध्यक्ष युवराज भोसले, वडूज शहर अध्यक्ष कुणाल रायबोले, रोहित कांबळे तसेच वंचितचे युवा कार्यकर्ते व विजयाचे शिल्पकार तुषार बैले उपस्थित होते.

COMMENTS