‘दार उघड बये’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

Homeताज्या बातम्या

‘दार उघड बये’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

नवीन मालिका १९ सप्टेंबरपासून, सोमवार ते शनिवार रात्री ८.३० वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

झी मराठी आपल्या प्रेक्षकांसाठी नेहमीच वेगवेगळ्या विषयाच्या मालिका आणत असते. भारत आता आधुनिकीकरणाकडे वाटचाल करताना सोबतच बऱ्यापैकी समाजात अंधश्रद्

पत्नीने केली पतीची दगडाने ठेचून हत्या
ठाकूर सागरसिंह, किशनसिंह पवार यांना(एम.बी.ए विषयात) पी.एच.डी. प्रदान
धनादेश अनादरप्रकरणी आरोपीस कारावास व दंडाची शिक्षा; अहिल्यानगर न्यायालयाचा निर्णय

झी मराठी आपल्या प्रेक्षकांसाठी नेहमीच वेगवेगळ्या विषयाच्या मालिका आणत असते. भारत आता आधुनिकीकरणाकडे वाटचाल करताना सोबतच बऱ्यापैकी समाजात अंधश्रद्धा निर्मुलनाचे काम जोरदार सुरु आहे. असाच एक विषय घेऊन ‘झी मराठी’ वर ‘दार उघड बये’ ही मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेत मुख्य भूमिकेत सानिया चौधरी(Sania Chaudhary) दिसत आहे. तसेच ती एक उत्तम नृत्यांगना असून ती या मालिकेत मंदिरातील संबळ वादकाची भूमिका साकारत आहे. ‘दार उघड बये’ ही नवीन मालिका १९ सप्टेंबरपासून, सोमवार ते शनिवार रात्री ८.३० वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

COMMENTS