Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पत्नीने केली पतीची दगडाने ठेचून हत्या

मुंबईतील मीरा रोड भागातील घटना

मुंबई/प्रतिनिधी ः नैराश्यात सापडलेल्या एका महिलेने आपल्या पतीची दगडाने ठेचून हत्या केल्याची धक्कादायक घटना मुंबईच्या मीरा रोड भागात घडली आहे. या

35 लाखांच्या खंडणीसाठी अपहरण.
धारदार शस्त्राने प्रेयसीची हत्या
पुण्यात इंजिनिअर तरूणीची गोळ्या झाडून हत्या

मुंबई/प्रतिनिधी ः नैराश्यात सापडलेल्या एका महिलेने आपल्या पतीची दगडाने ठेचून हत्या केल्याची धक्कादायक घटना मुंबईच्या मीरा रोड भागात घडली आहे. या महिलेला मानसिक आजार होता. पोलिसांनी तिला अटक केली आहे. रमेश गुप्ता (69) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. तर राजकुमारी असे आरोपी पत्नीचे नाव आहे. त्या गृहिणी आहेत.
गुप्ता दाम्पत्य आपल्या 30 वर्षीय मुलासह मीरा रोड येथील आनंद सरिता इमारतीच्या तळमजल्यावर राहत होते. त्यांच्या फ्लॅटमधून आवाज आल्यामुळे सुरक्षा रक्षक व शेजार्‍यांनी त्यांच्या घराकडे धाव घेतली. तेव्हा रमेश गुप्ता रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे दिसून आले. त्यांची पत्नी राजकुमारी मृतदेहाशेजारी उभ्या होत्या. हे चित्र पाहून शेजार्‍यांनी तत्काळ त्यांच्या मुलाला घरी बोलावून घेतले. तसेच त्याची माहिती पोलिसांनाही दिली. त्यानंतर नया नगर पोलिस तत्काळ घटनास्थळी पोहोचले. त्यांनी राजकुमारी यांना अटक करून चौकशी सुरू केली. त्या सध्या पोलिस कोठडीत आहेत. पोलिसांनी रक्ताने माखलेला दगडही जप्त केला आहे. गुप्ता दाम्पत्याच्या मुलाने सांगितले की, सकाळी कामावर जाताना आई-वडिलांत कोणताही वाद झाला नव्हता. दुपारी 4.30 च्या सुमारास मी घरी परतलो, तेव्हा वडील रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. त्यानंतर आई एक शब्दही बोलली नाही. दुसरीकडे, राजकुमारी यांनी पतीसोबत झालेल्या वादातून ही घटना घडल्याचे कबूल केले आहे. पण त्यांच्यात नेमक्या कोणत्या कारणावरून वाद सुरू झाला हे समजले नाही. पोलिसांच्या माहितीनुसार, राजकुमारी यांच्यावर नैराश्यात गेल्या होत्या. त्यांच्यावर तसे उपचारही सुरू होते. गुप्ता यांचीही प्रकृती चांगली नव्हती, असे ते म्हणाले. सध्या पोलिस राजकुमारी यांना सुरू असणार्‍या औषधींचा तपास करत आहेत. शेजार्‍यांच्या मते, या दाम्पत्याचा त्यांना कोणताही त्रास नव्हता.

COMMENTS