Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

ठाकूर सागरसिंह, किशनसिंह पवार यांना(एम.बी.ए विषयात) पी.एच.डी. प्रदान

अंबाजोगाई प्रतिनिधी - दि 19  जुन 2023 रोजी छ. संभाजीनगर येथे झालेल्या पी.एच.डी. व्हायवा मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाकडून अवॉर

नवीन तलाठी कार्यालयांचे प्रस्ताव तयार करा
वारीसाठी एका पालखीसोबत 40 वारकऱ्यांनाच परवानगी; विभागीय आयुक्तांचे लेखी आदेश
शंभर रूपयांच्या लाचेप्रकरणी अधिकार्‍याची सुटका

अंबाजोगाई प्रतिनिधी – दि 19  जुन 2023 रोजी छ. संभाजीनगर येथे झालेल्या पी.एच.डी. व्हायवा मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाकडून अवॉर्ड करण्याचे जाहीर केले आहे. ही पदवी येत्या 27 जुन 2023 रोजी विद्यापीठयाच्या 63 व्या दीक्षांत समारंभात महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल मा. श्री. रमेश बैस, डॉ. बा. आं. म. विद्यापीठाचे कुलगुरू प्रा.(डॉ.) प्रमोद येवले आणि भारतीय विद्यापीठ संघटनेचे सरचिटणीस प्रा. डॉ. पंकज मित्तल यांच्या उपस्थतीत देण्यात येणार आहे. प्रा. अभिजीत शेळके, छ. संभाजीनगर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांना मार्केटिंग इनोव्हेशन इम्पलेमेंटेशन – अ केस स्टडी ऑफ ऍन इंडियन फार्मास्युटिकल कंपनी (सिप्ला लिमिटेड) या विषयावर त्यांनी संशोधनाचे कार्य पूर्ण केले. तसेच त्यांनी 13 वर्ष फार्मास्युटिकल इंडस्ट्री मध्ये बिझनेस डेव्हलपमेंट व ब्रँड मॅनेजमेंट विभागात कार्य केले असून, त्यांनी 13 हुन अधिक मेडिसिन प्रॉडक्ट्स आपल्या भारतात व युरोप, आफ्रिका व आशियाई खंडातील देशांमध्ये लॉन्च केले आहेत. डॉ. सागरसिंह पवार यांनी यापूर्वी बी.एससी., एम.एससी. व एम.बी.ए. चे पदव्युत्तर शिक्षण प्रथम श्रेणीत उत्तीर्ण केल्या आहेत. त्याचबरोबर त्यांनी सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालय – भारत सरकार, केंद्रीय दक्षता आयोग – भारत सरकार, यू. के. पार्लिमेंट, जागतिक आरोग्य संघटना (थकज), ब्रिटिश कॉऊंसिल, केम्ब्रिज युनिव्हर्सिटी – इंग्लंड, युनिव्हर्सिटी ऑफ लंडन, युनिव्हर्सिटी ऑफ न्यूयॉर्क, नाण्यांग युनिव्हर्सिटी – सिंगापोर, युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया, किंग्सटन युनिव्हर्सिटी – लंडन, युनिव्हर्सिटी ऑफ नॉटिंगहॅम – चीन, लेडन युनिव्हर्सिटी – नेदरलँड, युनिव्हर्सिटी ऑफ केपटाउन, युनिव्हर्सिटी ऑफ साऊथर्न क्वीन्सलँड – ऑस्ट्रेलिया, नॅशनल इन्स्टिटयूट ऑफ नुट्रीशन (खउचठ-छखछ), राष्ट्रीय शैक्षणिक योजना व प्रशासन संस्थान (छखएझ-) अश्या नामांकित राष्ट्रीय व आंतराष्ट्रीय महत्वाच्या शैक्षणिक संस्थां मधून महिला सक्षमीकरण, आरोग्य सेवा, तरुणांना प्रोत्साहन, उच्च शिक्षण, शैक्षणिक नेतृत्व सक्षमीकरण, शिक्षणात लैंगिक समानता, उद्यमशीलता आणि एन.जी.ओ. व्यवस्थापन अश्या वैविध्यपूर्ण व विभिन्न क्षेत्रात डॉ. सागरसिंह पवार यांना 84 हुन अधिक प्रमाणपत्र प्राप्त केले आहेत. तसेच नुकत्याच झालेल्या एल.एल.बी. – सीईटीच्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण होऊन एडवोकेट या पदवीसाठी त्यांचा प्रवेश निश्चित झाला असून सध्या ते सर्वोदय सेवा प्रतिष्ठान, आडस या सामाजिक संस्थेच्या संस्थापक-सचिव पदी कार्यरत आहेत.या पी.एच.डी. च्या संशोधनकार्यासाठी पूर्व संशोधन मार्गदर्शक  प्रा. डॉ. राजेंद्र उढाण, प्रा. डॉ. एस यु सूर्यवंशी यांचे वडील किशनसिंह पवार, भाऊ सचिनसिंह पवार व मोनोजसिंह बंजरदार त्याचबरोबर प्रा. डॉ. मनोज बनस्वाल,  प्रा. डॉ. मोहनीश महामुने, कैलास पटणे, सुधीर सोनटक्के, डॉ. किशोर माने व भागवत जाधव यांनी सतत या कार्यासाठी प्रोत्साहन आणि प्रेरणा दिली. या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
————-

COMMENTS