Homeताज्या बातम्यामुंबई - ठाणे

दिल्ली विमानतळावर कस्टमची सर्वात मोठी कारवाई! बँकॉकहून आलेला ४८ कोटींचा ‘हायड्रोपोनिक गांजा’ जप्त!

https://www.youtube.com/watch?v=6JKfZM1swwc अंमली पदार्थांच्या आंतरराष्ट्रीय तस्करांना दिल्लीत कस्टम विभागाने आतापर्यंतचा सर्वात मोठा दणका द

कल्याण-टिटवाळ्यात सहा कोटींचे अमली पदार्थ जप्त
सिरसदेवी येथे एलसीबीचा छापा; 8 किलो गांजासह एकाला अटक
मुंबईत ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश; टिटवाळ्यात ६ कोटींच्या अमली गोळ्या जप्त, डान्सबारमधील तरुणीला बेड्या

अंमली पदार्थांच्या आंतरराष्ट्रीय तस्करांना दिल्लीत कस्टम विभागाने आतापर्यंतचा सर्वात मोठा दणका दिला आहे. दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर तब्बल ४८ कोटी रुपयांचा अत्यंत महागडा गांजा जप्त करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, अलीकडच्या काळातील ही देशातील सर्वात मोठी कारवाई मानली जात आहे.”
“बँकॉकहून आलेल्या दोन थायलंडच्या नागरिकांना संशयावरून कस्टम अधिकाऱ्यांनी ग्रीन चॅनल पार केल्यानंतर ताब्यात घेतले. सुरुवातीला सर्व काही सामान्य वाटत होते, मात्र जेव्हा त्यांच्या सामानाची कसून झडती घेण्यात आली, तेव्हा अधिकारीही चक्रावले. त्यांच्या बॅगेजमध्ये व्हॅक्यूम पॅक केलेले ६ मोठे पॅकेट्स लपवून ठेवण्यात आले होते. हे पॅकेट्स उघडले असता, त्यात तब्बल ४७ किलो ८०५ ग्रॅम वजनाचा अत्यंत उच्च दर्जाचा ‘हायड्रोपोनिक गांजा’ आढळून आला.”

COMMENTS