Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

विधानसभा अध्यक्षपदी आ. पृथ्वीराज चव्हाण यांची वर्णी शक्य

कराड / प्रतिनिधी : विधानसभेच्या अध्यक्ष पदासाठी अनुभवी नेत्याची निवड व्हावी, असा मुद्दा पुढे आल्याने माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांचे न

मनसे प्रमुख राज ठाकरे यांना कोर्टाचा पुन्हा धक्का; गुन्ह्यातून वगळण्याची मागणी न्यायालयाने फेटाळली
आ. जयंत पाटील यांनी एसटीची बस चालविल्याप्रकरणी आगार प्रमुखासह चालकावर कारवाईची भाजपाची मागणी; माझ्यावर खुशाल गुन्हा दाखल करा : आ. जयंत पाटलांचे प्रत्युत्तर
श्री सिध्दनाथ-देवी जोगेश्‍वरी शाही विवाह सोहळ्यास प्रारंभ

कराड / प्रतिनिधी : विधानसभेच्या अध्यक्ष पदासाठी अनुभवी नेत्याची निवड व्हावी, असा मुद्दा पुढे आल्याने माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांचे नाव अध्यक्षपदासाठी पुन्हा चर्चेत आले आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांचेही त्यावर एकमत होण्याची शक्यता वाढली आहे. त्यामुळे विधानसभा अध्यक्षपदी आ. पृथ्वीराज चव्हाण यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे.
राष्ट्रवादी व शिवसेना यांनी अनुभवी नेता देण्याची मागणी केली आहे. त्याला आ. चव्हाण यांनीही दुजोरा दिला. मात्र, काँग्रेस पक्षश्रेष्ठींचा निर्णय अंतिम असेल, असेही त्यांनी स्पष्ट केले. तिन्ही पक्षांच्या गोपनीय बैठकीत आ. चव्हाण यांच्या नावावर एकवाक्यता झाल्याचे वृत्त आहे. आ. संग्राम थोपटे यांच्या नावाला राष्ट्रवादी व शिवसेनेकडून विरोध झाल्याचे समजते. त्यामुळे ते नाव मागे पडून चव्हाण यांच्या नावाची पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. विधानसभेच्या अध्यक्षपदावरून मुंबईत बैठका सुरू आहेत.
विविध नेत्यांच्या नावांची चर्चा आहे. त्यापैकी आ. थोपटे यांच्या नावाला राष्ट्रवादी व शिवसेनेने सहमती दर्शवली नसल्याची चर्चा आहे. दोन्ही पक्षांनी अनुभवी व्यक्ती देण्याची मागणी केल्याने आ. चव्हाण यांच्या नावाची पुन्हा चर्चा सुरू झाली. त्याला काँग्रेसच्या निकटवर्तीय व विश्‍वासनीय सूत्रांनी दुजोरा दिला आहे. त्यामुळे चव्हाण यांच्या नावाची चर्चा पुढे आली आहे. विधानभवनात शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेसच्या महत्त्वाच्या नेत्यांची दुपारी बैठक झाली. त्या गोपनीय बैठकीत आ. चव्हाण यांच्या नावावर एकमत झाल्याचे खात्रीशीर वृत्त समोर आले आहे.
विधानसभेच्या अध्यक्षपदी एक जाणकार व अनुभवी नेता असावा, अशी चर्चा महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये झाली. त्या अनुशंगाने अनुभवी नेत्याकडे ते पद द्यावे, यावर एकमत असून त्याबाबत राष्ट्रवादी व शिवसेनेच्या नेत्यांनी काँग्रेसकडे मागणी केली आहे. त्या अनुशंगाने विधानभवनात महत्त्वाची बैठक झाली. त्याला काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, नाना पटोले, सतेज ऊर्फ बंटी पाटील, राष्ट्रवादीचे अजित पवार, जयंत पाटील, छगन भुजबळ, धनंजय मुंडे, शिवसेनेचे आदित्य ठाकरे, एकनाथ शिंदे, सुभाष देसाई उपस्थित होते. त्यात आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या नावावर बर्‍यापैकी नेत्यांचा होकार असल्याचे खात्रीशीर वृत्त आहे. त्याबाबत काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठांनाही माहिती कळविली आहे.

COMMENTS