Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शिर्डीतील 4 मालकांवर पिटा अंतर्गत कारवाई

3 पुरुषांसह एका महिलेला अटक

शिर्डी/प्रतिनिधी ः शिर्डी शहरात असलेल्या हॉटेलचा वापर समाज विघातक व पिढीत महिलांच्या माध्यमातून आर्थिक फायद्यासाठी  व आंबट शौकीन यांच्यासाठी होत

कार्तिक पौर्णिमेच्या उत्सवासाठी देवगड नगरी सज्ज
डोक्यात दांडा मारून एकाचा खून
काँग्रेसचा महापौर करण्याचे थोरातांसमोर आव्हान ; शिवसेना-राष्ट्रवादीच्या मनोमीलनाने काँग्रेस बॅकफूटवर, चमत्काराची आशा मात्र धुसर

शिर्डी/प्रतिनिधी ः शिर्डी शहरात असलेल्या हॉटेलचा वापर समाज विघातक व पिढीत महिलांच्या माध्यमातून आर्थिक फायद्यासाठी  व आंबट शौकीन यांच्यासाठी होत असल्याने व त्यातून पैसे कमावण्यासाठी होत असल्याचे पोलीस कारवाईत पुढे आले होते. महिलांचे शोषण करणारा व्यक्ती कितीही मोठा असला तरी त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात येईल असे संकेत शिर्डी शहरात 5 मे 2023 रोजी पडलेल्या 6 हॉटेल कारवाईच्या वेळी पोलिस प्रशासनाने दिला होता. त्या कारवाईत पोलिसांनी नऊ आरोपींना अतिशय नियोजनबद्ध मोठा पोलिस फौजफाटा घेऊन एकाच वेळी इतकी मोठी कारवाई करत पहिल्यांदाच अटक केली होती. त्या अनुषंगाने 11 मे रोजी उशिरा शिर्डी पोलिसांनी तीन हॉटेल मालकांच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून, त्या तिघांनाही ताब्यात घेऊन अटक 11मे रोजी अटक करण्यात आली आहे.
अधिक माहिती अशी की, सहा मे रोजी जिल्हा पोलीस प्रमुख राकेश ओला अप्पर पोलिस अधीक्षक स्वाती भोर उपविभागीय अधिकारी संजय सातव, पोलिस निरीक्षक नंदकुमार दुधाळ यांच्या मार्गदर्शनाखाली धाडसी कारवाई करून काही पिडितासह आरोपींना ताब्यात घेण्यात आले होते. त्यात अकरा आरोपीचा समावेश होता. यात आता आणखी 4 आरोपींचा समावेश असून हे च़ौघेही हॉटेल मालक आहेत. यातील साई महाराजा लॉजिंगचे मालक राजेंद्र मनसुखलाल लोढा वय 60 राहणार, प्रसादनगर शिर्डी यांच्याविरोधात गुन्हा रजिस्टर नंबर 320/2023 पिटा कायदा कलम 3,4,5,78 या प्रमाणे तर साई गणेश लॉजिगचे मालक सुनील पृथ्वीराज लोढा वय 58 रा एरिगेशन बंगल्याशेजारी शिर्डी गुन्हा रजिस्टर नंबर 324/2023 पिटा कायदा कलम 3,4,5,7,8प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. तर हॉटेल एस.पी.लॉजिगंचे मालक एजाज आयानखान पठाण वय 44 रा साकुरी शिव शिर्डी यांच्याविरोधात गुन्हा रजिस्टर नंबर 322/2023, भादवी 366 (अ) 366 (ब) 370, 372, 373, 376, सह पिटा कायदा कलम 3,4,5,7,8, सह पोस्को कायदा कलम 4,8,12, प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 12 मे रोजी राहता न्यायालयात हजर केले असता लोढा यांना एक दिवसाची तर पठाण यास तीन  पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. दोन्ही लोढा यांना 13मे रोजी राहता न्यायालयात हजर केले असता त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे यात 13 मे जी राहुरी येथील महिला विद्या रविंद्र करपे वय 55 राहणार राहुरी   या हॉटेल मालकीणीला अटक करण्यात आली असून तिला 15 दिवसाची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे, अशी माहिती शिर्डी पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक नंदकुमार दुधाळ यांनी दिली. त्यांनी सांगितले की,   उर्वरित राहीलेल्या लॉजिग मालकाचा देखील शोध घेण्यासाठी पोलीस पथक प्रयत्न करत असुन त्यांना देखील ताब्यात घेतले जाणार असून या या अगोदर लॉजिग मॅनेजर व रूम बॉय यांच्यावर अगोदरच गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रतिष्ठित असलेल्या लॉजिग मालकांना पोलिसांनी अटक केल्यामुळे शिर्डी शहरात मोठी खळबळ उडाली असून शिर्डी शहरातील या गुन्ह्याच्या संबंधातील काही आरोपी परागंदा झाल्याने त्याचा उशिरा पर्यंत पोलीस पथक शोध घेत होते. यात अत्यंत बारकाईने तपास सुरू असुन आरोपीच्या सहवासात कोण होते त्यांना पाठबळ कोणाचे होते त्याबरोबरच अशा पद्धतीने कमावलेल्या पैशाची गुंतवणूक कोठे कशी करण्यात आली आहे याची देखील चौकशी केली जाणार असल्याचे पोलीस निरीक्षक नंदकुमार दुधाळ यांनी सांगितले.  

COMMENTS