Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मुंब्र्यात भरदिवसा गोळीबाराचा थरार; एक ठार, तिघे गंभीर जखमी

ठाणे : मुंब्रा परिसरातील कैलास नगर येथे गुरुवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास घडलेल्या भरदिवसा गोळीबाराच्या घटनेने संपूर्ण परिसर हादरला. छेडछाडीच्य

खाण परवानग्यांचे अधिकार आता थेट जिल्हाधिकार्‍यांकडे;महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा मोठा निर्णय
पेपरफुटी : व्यवस्था कमकुवत की संगनमत? परीक्षा पद्धतीमधील खोलवर रुजलेल्या भ्रष्टाचाराने विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला
मुंबईसह पश्‍चिम महाराष्ट्रात पावसाचा हाहाकारअतिवृष्टीमुळे पूरस्थिती ; रस्ते झाले जलमय, अनेक ठिकाणी संपर्क तुटला

ठाणे : मुंब्रा परिसरातील कैलास नगर येथे गुरुवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास घडलेल्या भरदिवसा गोळीबाराच्या घटनेने संपूर्ण परिसर हादरला. छेडछाडीच्या वादातून संतप्त झालेल्या एका व्यक्तीने शाळेजवळ चौघांवर बेछूट गोळीबार केल्याने एकाचा मृत्यू झाला, तर तिघे जण गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपीला अटक केली आहे.
प्राथमिक माहितीनुसार, जयन शिवानंदन नायर (वय 51) याने आपल्या मानलेल्या बहिणीशी संबंधित छेडछाडीच्या वादातून हा हल्ला केल्याचे समोर आले आहे. संतापाच्या भरात त्याने अब्दुल हसन शेख, अकबर अब्दुल शेख आणि समीर अहमद शेख यांच्यावर गोळ्या झाडल्या. या हल्ल्यात अकबर शेख यांचा जागीच मृत्यू झाला, तर इतर तिघे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सध्या काळसेकर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना सुमनताई चव्हाण प्राथमिक विद्यालयाजवळ घडल्याने विद्यार्थ्यांमध्येही भीतीचे वातावरण निर्माण झाले. घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली होती. गोळीबार करून आरोपी घटनास्थळावरून पसार झाला होता; मात्र मुंब्रा पोलिसांनी तत्काळ सर्च मोहीम राबवून काही वेळातच त्याला शस्त्रासह ताब्यात घेतले.

COMMENTS