Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

काँगे्रस खा.डॉ.प्रशांत पडोळे थोडक्यात बचावले; नागपुरजवळ भीषण अपघात, गाडीचा चक्काचूर

नागपूर : भंडारा-गोंदिया मतदारसंघाचे काँग्रेसचे खासदार डॉ. प्रशांत पडोळे यांचा सोमवारी पहाटे नागपूरजवळ भीषण अपघात झाला. विमानतळाकडे जात असताना त्य

महाराष्ट्र ‘हॉटस्पॉट’! अकोल्याचा पारा ४७ अंशांच्या उंबरठ्यावर; विदर्भात उष्णतेचा हाहाकार, नागपूर-लातूरमध्ये उष्माघाताने दोघांचा बळी
आयआयआयटीतील विद्यार्थ्याचा मृत्यू
धीरेंद्र शास्त्रींचे छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह विधान; राज्यभरातून उमटतायत तीव्र पडसाद

नागपूर : भंडारा-गोंदिया मतदारसंघाचे काँग्रेसचे खासदार डॉ. प्रशांत पडोळे यांचा सोमवारी पहाटे नागपूरजवळ भीषण अपघात झाला. विमानतळाकडे जात असताना त्यांच्या वाहनाला ट्रकची जोरदार धडक बसली. धडकेचा वेग इतका तीव्र होता की गाडीचा पुढील भाग पूर्णपणे चक्काचूर झाला. मात्र सुदैवाने पडोळे या अपघातातून थोडक्यात बचावले.
मिळालेल्या माहितीनुसार, संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनासाठी दिल्लीला जाण्यासाठी पडोळे हे पहाटे नागपूरहून विमानतळाकडे निघाले होते. त्यांच्या सोबत सुरक्षारक्षक आणि चालकही होते. नागपूर जिल्ह्यातील हल्दीराम परिसरात अचानक समोर आलेल्या ट्रकने त्यांच्या वाहनाला जोरदार धडक दिली. या अपघातात वाहनाचे मोठे नुकसान झाले, तर पडोळे यांना किरकोळ दुखापत झाली. अपघातानंतरही त्यांनी धैर्य आणि प्रसंगावधान राखत परिस्थितीवर नियंत्रण ठेवले. तातडीने त्यांनी एका दुचाकीस्वाराची मदत घेत नागपूर शहर गाठले. तेथे प्राथमिक उपचार घेतल्यानंतर त्यांनी नियोजित दौरा रद्द न करता पुढील प्रवास सुरू ठेवला. त्यानंतर ते विमानतळावर पोहोचून दिल्लीकडे रवाना झाले. या घटनेत त्यांच्या सोबत असलेल्या सुरक्षारक्षक आणि चालक यांची प्रकृतीही स्थिर असल्याचे समजते. अपघातानंतर काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. अपघात नेमका कसा घडला, याचा तपास स्थानिक पोलिसांकडून सुरू आहे. दरम्यान, काही महिन्यांपूर्वीही नागपूरमध्येच पडोळे यांच्या वाहनाचा अपघात झाला होता. त्या वेळीही ते किरकोळ जखमी झाले होते. अल्पावधीत दोनदा अपघात घडल्याने त्यांच्या सुरक्षेबाबत प्रश्‍न उपस्थित होत आहेत. वाहन सुरक्षा, मार्ग नियोजन आणि संरक्षण व्यवस्थेबाबत अधिक दक्षता घेण्याची गरज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

COMMENTS